20 वर्षात चीनमधून आल्या 5 महामारी, आता याला थांबवायला हवं : US NSA

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात 2.83 लाख लोकांचा जीव घेणाऱ्या कोरोना व्हायरस महामारीसाठी चीनला जबाबदार ठरवून अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी सांगितले की, गेल्या 20 वर्षामध्ये चीनमधून पाच महामारी आली आहे. या महामारीला कोणीच रोखण्याचा प्रयत्न केला नाही.

ओ ब्रायन यांनी मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले की, जगभरातील लोक एकत्र उभे राहून चीन सरकारला म्हणतील की, ‘आम्ही चीनमधून आलेल्या महामारीला सहन करणार नाही.’ मग ही महामारी जनावरांपासून आलेली असो किंवा प्रयोगशाळेतून.’

ते म्हणाले की, ‘आम्हाला माहित आहे की कोरोना व्हारयस हा वुहानमधून पसरला आहे. आणि परिस्थितीजन्य पुरावा आहे जे स्पष्ट सांगत आहे की, ही महामारी कुठल्यातरी जनावरांपासून किंवा प्रयोगशाळेतून पसरली आहे.’