सतत ढेकर येण्याची 1 नव्हे तर असू शकतात ‘ही’ 5 कारणं ! जाणून घ्या उपाय

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  जेव्हा आपण कोल्डड्रींक किंवा एखादं फ्रिजी ड्रिंक पितो तेव्हा आपल्याला ढेकर येतो. कोल्डड्रींकमध्ये कार्बन डायऑक्साईड असल्यानं ते पोटात गेल्यानंतर पोटात गॅस बनतो आणि ढेकर येऊन हा गॅस बाहेर पडतो. परंतु अनेकदा असंही होतं की, जेव्हा तुम्ही फ्रिजी ड्रींक पित नाहीत, तरीही तुम्हाला ढेकर येतो. याचं कारण काय असेल असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आपल्या पोटात अनेक प्रकारचे ॲसिड आणि ज्यूस असतात जे जेवण पचवण्याचं काम करतात. पचनावेळी शरीरात गॅस तयार होतो जो दोन प्रकारे पोटातून बाहेर पडतो. एक म्हणजे ढेकराच्या रुपात आणि दुसरा फार्टच्या रूपात.

त्यामुळं ढेकर देणं तसं पाहिलं तर चांगलं आहे. कारण यामुळं पोटातील गॅस बाहेर पडतो. हा गॅस जर पोटात राहिला तर पोटदुखी किंवा ब्लोटींगची समस्या येते. तुम्ही पाहिलं असेलच की, ॲसिडीटी झाल्यानंतर ढेकर आला तर थोडा आराम मिळतो. परंतु कधी कधी असंही होतं की, तुम्हाला सतत ढेकर येतो. असं असेल तुम्हाला काही समस्या असू शकतात. या समस्या कोणत्या आहेत याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. यासाठी काय करायला हवं हेही आपण माहित करून घेणार आहोत.

1) तुम्ही हवा गिळली असावी – तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, आपण हवा कशी गिळतो ? च्युईंगगम खाताना, खूप लवकर खाण्यानं स्ट्रॉनं काही पिण्यानं किंवा जेवताना बोलल्यानं आपण हवा गिळत असतो. ही हवा पोटातच अडकते. यामुळं सामान्यापेक्षा जास्त ढेकर येतात. तुम्हाला माहित आहे का की, जेव्हा टेंशनमध्ये किंवा नर्व्हस असतो तेव्हाही हवा गिळत असतो. या प्रक्रियेला एरोफेजिया म्हणतात.

2) गॅस निर्माण करणारे पदार्थ खाल्ल्यानं – तांदळासारखे जास्त स्टार्च असणारे पदार्थ जास्त फूड गॅस निर्माण करतात. प्रत्येक व्यक्तीची पचनसंस्था वेगळी असते. यामुळं प्रत्येकाची अन्न पचन करण्याची गती वेगळी असते. जर तुमची पचनक्रिया मंद असेल तर तुम्हाला जास्त ढेकर येतात. जेवणात जेवढं जास्त सॅलड असेल तेवढं पचण्यास जास्त मदत होते.

3) तुम्हाला असू शकतो इर्रिटेबल बाऊल सिंड्रोम – हा सिंड्रोम असणाऱ्या लोकांना कायमच अतिसार, बद्धकोष्ठता आणि पचनसंस्थेसंबंधित तक्रारी असतात. बद्धकोष्ठतेमुळं गॅस पोटात राहतो. यामुळं ढेकर येतो. हा सिंड्रोम झाल्यांतर पोटदुखीचाही त्रास होतो. अशा स्थितीत डॉक्टरांकडे जायला हवं. ओव्यामुळं पोटदुखी आणि पोाटच्या समस्या दूर होतात.

4) डायबिटीज – डायबिटीज असलेल्या लोकांना एका समस्येचा सामना करावा लागू शकतो तो म्हणजे गॅस्टोपरेसिस. या समस्येत पोटाच्या स्नायूंवर प्रभाव पडतो. यामुळं पोटावरही याचा परिणाम होतो. त्यामुळं या समस्येत उलटी, गोंधळणं आणि अधिक प्रमाणात ढेकर येणं अशा समस्या येतात.

5) सिलिएक डिजीज – सिलिएक डिजीज त्या लोकांमध्ये नेहमी दिसून येतो ज्यांना ग्लूटेनपासून अॅलर्जी असते. ब्रेड आणि बार्लेसारखे ग्लूटेनयुक्त पदार्थ पचनतंत्रात सूज निर्माण करतात. याशिवाय लहान आतडेही यामुळं डॅमेज होतात. यामुळं पचनक्रियेत समस्या येतात. यामुळं ब्लोटींग, पोटदुखी, क्रॅम्प्स आणि जास्त प्रमाणात ढेकर आणि फार्टची समस्या येते. तुमच्या रोजच्या जीवनात जर व्यायामाचा अभाव असेल तर यामुळंही सतत ढेकर येतात. जर जेवल्यांतर तुम्ही लगेच झोपत असाल तर अशा स्थितीतही सतत ढेकर येतात. वृद्धांमध्ये ही समस्या कायम दिसते. कारण त्यांच्यात व्यायामाचा अभाव असतो.

काय करावा उपाय ?
जेवण केल्यानंतर किमान 30 मिनिट वॉक नक्की करा. यामुळं पचनासंबंधी समस्या येत नाहीत आणि ढेकरही कंट्रोलमध्ये राहतात.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.