डायबिटिक ‘कोमा’मध्ये होती आई, 5 वर्षाच्या मुलाच्या खेळण्यानं वाचवले ‘प्राण’ !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इंग्लंडच्या टेल्फर्डयेथील एका 5 वर्षाच्या मुलाच्या शहाणपणामुळे त्याच्या आईचे प्राण वाचले आहे. दरम्यान, या मुलाची आई बेशुद्ध होऊन पडली होती. जर त्यांना योग्य वेळी रुग्णालयात नेले गेले नसते तर तिचा मृत्यू होऊ शकला असता किंवा ती कोमात जाऊ शकली असती. पण मुलाने जे केले त्यामुळे त्याच्या आईचे प्राण वाचले.

आपल्या खेळण्यावरच डायल केला नंबर
असे घडले की, जॉश चॅम्पयन आपल्या भावासोबत खेळत होता. यावेळी त्याने पाहिले की, त्याची आई जमिनीवर पडली आहे. उशीर न करता जॉश आपल्या टॉय अँम्ब्युलन्समध्ये 112 इमर्जन्सी क्रमांक डायल केला. त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली.

जाऊ शकला असता आईचा जीव
पोलिस अधीक्षक म्हणाले की, जर थोडा वेळ झाला असता तर जॉशच्या आईचा जीव गेला असता. पोलिसांनी त्याचे कौतुकही केले. पोलिसांनी त्याच्या आईला डॉक्टरांकडे नेले. तेथे ती डायबेटिज कोमामध्ये असल्याचे समजले. तिची साखरेची पातळी अत्यंत खाली गेली होती.