राज्य उत्पादन शूल्क विभागाची मोठी कारवाई, ५२ लाखांचा मद्यसाठा जप्त

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – मध्य प्रदेशातून मुंबई येथे अवैधरित्या विक्रीसाठी मद्य घेवून जाणाऱ्या ट्रकवर ठाणे राज्य उत्पादन शूल्क विभागाने पकडून ५१ लाख ७१ रुपयाचा मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत ४०० बॉक्स मद्यासह एक ट्रक, चारचाकी गाडी असा मुद्देमाल जप्त करुन तिघांना अटक करण्यात आली आहे. या मद्याची वाहतूक करण्यासाठी ट्रकमध्ये ५ फुटाचा बॉक्स तयार करण्यात आला होता. त्यामुळे प्रथम दर्शनी संपूर्ण ट्रक रिकामा असल्याचे दिसून येत होते. अशी माहीती राज्य उत्पादन शूल्क विभागाचे निरीक्षक सुधीर पोफळे यांनी दिली.

ट्रक चालक संतोष सुरेंद्र सिंग, मद्याच्या मालाचा मालक हरीभाऊ खैरे व सुविनय गोर्वधन काळे उर्फ अमोल असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणूका जाहीर होणार आहेत. या निवडणुकीच्या काळात मतदरांना दारुचे अमिष दाखविण्यासाठी देखील या मद्यांचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठाणे राज्य उत्पादन शूल्क विभागाच्यावतीने अशा अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे.

मध्यप्रदेशातून अवैध्य दारु मुंबई येथे विक्रिसाठी ट्रकमधून घेऊन जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शूल्क विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने मुंबई – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील शहापुर तालुक्यातील खर्डी येथे परराज्यातील संशयीत ट्रक तपासणीसाठी थांबविला होता. त्यावेळी ट्रक चालकाकडे विचारणा केली असता, ट्रक रिकामा असून त्यात दारू नसल्याचे सांगितले. त्यावेळी ट्रकच्या आत जावून तपासणी केली असता, ट्रकच्या आतील भागात एक लोखंडी पट्टी नटबोल्टच्या सहाय्याने फिट केली असल्याचे निदर्शनास आले. वाहन चालक आणि ट्रकच्या मागील बाजुस पाच फुटाचे बॉक्समध्ये बॉम्बे स्पेशल विस्कीचा मध्य प्रदेश निर्मीत दारुचा साठा आढळून आला.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क मुंबई प्राजक्ता लवंगारे-वर्मा, विभागीय उपायुक्त कोकण विभाग ठाणे तानाजी साळूंखे, संचालक अंमलबजावणी व दक्षता मुंबई सुनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे राज्य उत्पादन विभागाचे निरीक्षक सुधीर पोकळे, निरक्षिक अनिल राठोड, जवान दिपक दळवी, जगन्नाथ आजगावकर यांच्या पथकाने केली.

महत्वाच्या बातम्या

शिवाजीनगर न्यायालयाजवळ रावण गँगच्या दोघांकडून गोळीबार

अमावस्याच्या रात्री आमदार सतेज पाटील यांच्या बंगल्यासमोर करणीचा प्रकार

साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय

उद्योग धोरण मंजूर करून घेण्यासाठी दलाली ; राष्ट्रवादीचा आरोप

राहुल गांधींचा भारतीय हवाई दलापेक्षा पाकिस्तानवर अधिक विश्वास