57 किलोच्या उर्वशीनं उचललं चक्क 80 किलो वजन ! व्हिडीओ झाला व्हायरल (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूडमधील हॉट अॅक्ट्रेसपैकी एक उर्वशी रौतेला सध्या सोशल मीडियावर सुपरअॅक्टीव दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ अटेंशन घेत आहेत. सध्या रेग्युलर बिकिनीत दिसत असलेल्या उर्वशीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळं ती चर्चेत आली आहे.

उर्वशीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती वर्कआऊट करताना दिसत आहे. उर्वशी ग्लूट थ्रस्ट वर्कआऊट करत आहे. खास बात अशी की, हे वर्कआऊट करत असताना 57 किलोची उर्वशी चक्क 80 किलो वजन उचलत आहे. सध्या तिचा हा वर्कआऊट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहतेही तिचं कौतुक करताना दिसत आहेत.

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हर्जिन भानुप्रिया या सिनेमात दिसणार आहे. यातील एक आयटम नंबरीही अलीकडेच रिलीज करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी ती एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडीओत आणि पागलपंती सिनेमात दिसली होती. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भूलभूलैया या सिनमात दिसणार आहे. सिंह साहब दी ग्रेट या सिनेमातून तिनं सनी देओलसोबत बॉलिवूड डेब्यू केला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like