७ पोलीस निरीक्षकांच्या (PI) बदल्या

नांदेड :   पोलीसनामा ऑनलाईन- (माधव मेकेवाड) – लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने महाराष्ट्र भर बदल्यांचे सत्र सुरू आहे.  पण नांदेड जिल्हा मात्र जिल्ह्या अंतर्गत बदली करण्यात यशस्वी ठरला आहे. पोलीस अधीक्षक मीना यांच्या बदली नंतर नांदेड ची धुरा संजय जाधव यांच्या कडे आल्याने नांदेड जिल्ह्यात अनेक भागात त्यांनी अवैध धंद्यांना लगाम घातला आहे. त्यामुळे गुन्हेगारी वर्ग नरमला आहे. येणाऱ्या लोकसभेला पोलीस सतर्कता बाळगावी म्हणून पोलीस अधीक्षक यांनी बदल्यांचे सत्र सुरू केले.

आर. एस. पडवळ (पोलीस निरीक्षक) यांनी दि. १७ ऑगस्ट २०१७ रोजी भोकर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदकक्ष पोलीस निरीक्षक म्हणून पद भार सांभाळण्यास सुरुवात केली. दि. २२ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांची नांदेड येथे बदली झाली केवळ १८ महिन्यातच त्यांना भोकर पोलीस स्टेशन सोडावे लागले. बदली प्रक्रियेत त्यांची नियंत्रण कक्ष नांदेड येथे बदली केली गेली होती.

नांदेड पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या अधिकारान्वये जिल्हा अंतर्गत बदल्या  पोलीस नियंत्रण कक्षातून बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांची नावे व बदलीचे नुतन ठिकाण कंसात दर्शविण्यात आले आहेत.

सी.टी.चौधरी (पो.ठाणेशिवाजीनगर,नांदेड), एस.ए.डोईफोडे (पो.ठा.कंधार), एन.जी.आकूसकर (पो.ठा.मुखेड), आर.पी.गाडेकर(पो.ठा.हदगाव), पी.बी.शेळके (पो.ठा.लिंबगाव) आर.एस.पडवळ (पो स्टे नायगाव) एस. के. माछरे (पो.ठा.मुदखेड) ,असे आहेत.