Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6741 नवे पॉझिटिव्ह तर 213 जणांचा मृत्यू, 4500 जण झाले बरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ सुरुच आहे. आज राज्यात 6741 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 213 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 67 हजार 665 इतकी झाली आहे. राज्याच्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने इराणला देखील मागे टाकले आहे. www.worldometers.info नुसार इराणचा 11 वा क्रमांक लागतो.


राज्यात गेल्या 24 तासामध्ये 213 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 10695 एवढी झाली आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 4500 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 1 लाख 49 हजार 007 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहेत.

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 67 हजार 665 इतकी झाली असून त्यापैकी 1 लाख 7 हजार 665 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. या रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान मुंबईत गेल्या 24 तासामध्ये 954 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 70 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या 90100 इतकी झाली आहे. तर मुंबईत 5405 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.