महाआरोग्य शिबिरात ६८९ रुग्णांची तपासणी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – धुळे तालुक्यातील आर्वी येथे शेणगे हायस्कूल येथे नुकतच मोफत शस्त्रक्रिया व महाआरोग्य तपासणी शिबीर दोस्ती ग्रुप व युवा प्रतिष्ठान आर्वी, सुयश हॉस्पिटल नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने झाले. यात ६८९ रुग्णांनी तपासणी केली.

शिवजयंती निमित्त झालेल्या शिबिरात चष्मा, मोफत औषधे, कॅन्सर, मूत्र मार्ग विकार, हाडांचे विकार, अस्थमा, ह्द्यविकार उपचार, सांधे व फुफ्फुसाचे आजार, मणक्याचे आपरेशन, रक्तदाब तपासणी, मूत्रपिंड, मुतखडा, अस्थिव्यंग, किडनीचे विकार, डायलिसीस, पोटाच्या संदर्भात आपरेशन, मधुमेह तपासणी तसेच आदी आजारांवर एकूण तपासणी करण्यात आली. शिबिरात डॉ. लता दिराश्री व डॉ. धवल दिराश्री यांचे मार्गदर्शन लाभले. आयोजक सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गोबा कोळी, ग्रा. पं. सदस्य लताबाई राजेंद्र सोनवणे, सावन राजेंद्र सोनवणे यांनी केले होते. जनसंपर्क अधिकारी जितेंद्र पाटील, परेश आंबेकर हे होते. शिबिरासाठी चेअरमन विश्वास बागले ,सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र चौधरी ,राजेंद्र सोनवणे ,किशोर अल्लोर ,रविंद्र पाटकर यांचे मार्गदर्शन लाभले.