ऐश्वर्यासह ‘या’ सात अभिनेत्रींनी नाकारली होती ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाची ऑफर

मुंबई : वृत्तसंस्था – आजपर्यंत चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती झाली. या चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. तर काही चित्रपटातून प्रेमकथा दाखवण्यात आल्या. असे अनेक सुपरहिट चित्रपट असतील जे अजूनही चांगली कथा, कलाकार आणि दिग्दर्शनामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.त्यातीलच एक सुपरहिट  चित्रपट म्हणजे करण जोहरचा ‘कुछ कुछ होता है’

या चित्रपटात शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल मुख्य भूमिकेत झळकले होते. यांच्या दमदार केमिस्ट्रीमुळे आजही या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.पण याचित्रपटात काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या आधी अनेक अभिनेत्रींना विचारण्यात आले होते. पण काही कारणामुळे या अभिनेत्रींनी या चित्रपटाला नकार दिला. या सुपरहिट चित्रपटाचा भाग होण्याची संधी या अभिनेत्रींनी गमावली.

या अभिनेत्रींनी नाकारली ‘कुछ कुछ होता है’ ची ऑफर 

१. करिश्मा कपूर – त्याकाळी आघाडीची अभिनेत्री असलेल्या करिश्मा कपूरला चित्रपटातील भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. पण एका प्रोजेक्टमध्ये बिझी असल्यामुळे करिश्माने चित्रपट नाकारला.
२.ऐश्वर्या राय बच्चन – बॉलिवूड तसेच हॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेली अभिनेत्री ऐश्वर्या रायने देखील या चित्रपटासाठी नकार दिला होता. मात्र काही वैयक्तिक कारणासाठी तिने ही ऑफर धुडकावून लावली होती.
३. शिल्पा शेट्टी –  १९९३ साली ‘बाजीगर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या शिल्पा शेट्टीला सुद्धा या चित्रपटाची ऑफर आली होती.मात्र तीनेही काही कारणामुळे या चित्रपटाला नकार दिला. शिल्पाने आतापर्यंत ४० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे
४. उर्मिला मातोंडकर – ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरने तिच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. म्हणून तिला या चित्रपटासाठी विचारण्यात आले होते पण तिने या चित्रपटाला स्पष्टपणे  नकार दिला होता. जर तिने हा चित्रपट केला असता तर तिच्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचाही समावेश झाला असता.
५. ट्विंकल खन्ना – अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिला सुद्धा या चित्रपटासाठी विचारण्यात आले होते परंतु चित्रपटाची स्क्रिप्ट पसंत नसल्याने तिने या चित्रपटाला नकार कळवला.
६. रविना टंडन – ९० च्या दशकात ‘दिलवाले’आणि ‘मोहरा’सारख्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री रविना टंडनला  तिच्या लोकप्रियतेमुळे या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. मात्र राविनाने या चित्रपटाला नकार दिला.
७. तब्बू – अनेक  चित्रपटात वेगळ्या  भूमिका साकारलेल्या तब्बूला राणी मुखर्जीने साकारलेल्या भूमिकेबद्दल विचारण्यात आले होते. या भूमिकेसाठी तब्बूने नकार दिल्यानंतर राणीला या भूमिकेसाठी फायनल करण्यात आले.