पोलिसांवरील गोळीबार प्रकरणात आणखी ७ नायजेरियन गजाआड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील भायखळ्यामध्ये पोलीस आणि नायजेरियन ड्रग्ज माफियांमध्ये मोठी चकमक उडाली होती. नायजेरियन माफियांचा पाठलाग करत असताना या माफियांनी पोलिसांवर गोळीबार केला होता. ही घटना १५ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. या घटनेत ४ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. पोलिसांनी माफियांकडून केलेल्या गोळीबाराला प्रतिउत्तर देत ७ जणांना अटक करुन २० लाखाचा ऐवज जप्त करण्यात केला होता. याप्रकरणात पोलिसांनी आणखी ७ जणांना अटक केली असून अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या १४ झाली आहे.

सोमवारी पोलिसांनी ओबिता इनोसन्ट इनामडी (२४,) ओझानडी लिजना इफानी (२३),इझे मायकेल चुकुवोमा (२८), ओबीना उगवेझी (२८),दिबा ओलीव्हर नकी (३८),चिडीबेरे मायकल ओकोली (२८),मायकल चुकुवोमा उचेजिम्बा (४५, सर्व रा. कृष्णा रेसिडन्सी मिरा रोड) अटक केली. त्यांच्याकडून कोकेन, एम.डी. पावडरस दहा जिवंत काडतुसे, सात पासपोर्ट, १५ मोबाईलसह चार लाखाची रोकड जप्त केली आहे. सर्वांना २८ डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी मिळाली आहे.

भायखळ्यात नायजेरियन ड्रग्स माफिया हे ड्रग्स विकण्यासाठी आल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी झोन क्रमांक तिनेमध्ये दुपारी तीनच्या सुमारास पाच ते सात नायजेरियन तरुणाची टोळीला पाहिलं. पोलिसांनी या टोळक्याची तपासणी सुरू केली. पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनवेळी त्यांनी पळ काढला आणि पोलिसांवर रिव्हालवरमधून गोळीबार केला. पोलिसांनीही प्रतिउत्तर दाखल नायजेरियन टोळीवर गोळीबार करून ७ जणांना जेरबंद केले होते.

१५ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या कारवाईत ७ जणांना अटक करुन २० लाख रुपये किंमतीचे कोकेन, एक रिव्हालवर आणि 4 जिवंत काडतूसही जप्त करण्यात आले होते. या टोळीच्या विरोधात अवैधशस्त्र आणि अमली पदार्थ वापरण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.