सर्वोच्च न्यायालयाच्या २७ पैकी ७ च न्यायाधिशांनी केली मालमत्ता जाहिर

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाच्या २७ न्यायाधिशांपैकी केवळ ७ न्यायाधिशांनीच आपली संपत्ती जाहिर केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले असून ही यादी सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्यासह इतर सहा न्यायाधीशांनी आपली संपत्ती जाहिर केली आहे. न्यायमुर्ती एस. एस बोबडे, न्या. एन. व्ही. रमणा, न्या. अरुण मिश्रा, न्या. आर. बानुमती, न्या. ए.एम. खानविलकर, न्या. अशोक भुषण यांनी आपली संपत्ती जाहीर केली.

आपली संपत्ती जाहिर करणे न्यायाधिशांसाठी ऐच्छिक असून न्यायव्यवस्थेत पारदर्शकता ठेवण्यासाठी जाहिर करणे गरजेचे आहे. संकतेस्थळावर जाहीर केलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश गोगोई यांनी ६ जून २०१८ रोजी आपली गुवाहटी येथील ६५ लाख रुपयांची जमीन ६५ लाख रुपयांना विकली असून त्यावर १ टक्के करही भरला आहे.

सरन्यायाधीशांच्या पत्नीच्या नावावर एकही वाहन नाही. किंवा कर्ज नाही. तर त्यांच्यानंतर ज्येष्ठ असलेले न्यायामुर्ती बोबडे यांची नागपूरमध्ये वडिलोपार्जित मालमत्ता असून मुंबईमध्ये एक भागिदारी असलेला फ्लॅट आहे. त्यांच्या नावावर एकही वाहन नाही.

तर न्यायमुर्ती एन. व्ही. रमणा आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर अनेक मालमत्ता आहेत. तर त्यांच्यावर ३९ लाख रुपयांचं कर्जही आहे. त्यांनी मार्च २०१८ मध्येच आपली मालमत्ता संकेतस्थळावर जाहिर केली आहे. न्या. अरुण मिश्रा यांच्या नावावर २ भुखंड, आणि ग्वाल्हेर येथे वडिलोपार्जित घर आणि नोएडा येथे एक फ्लॅट आहे. त्याचा ताबा त्यांना अद्याप मिळालेला नाही.

तर न्या. खानविलकर यांचे नवी दिल्लीत एक घर आहे. तर मुंबईमध्ये पती पत्नीच्या नावे एक मालमत्ता आहे. त्यांच्या खात्यात काही डिपॉजिट आहेत. तसेच गृहकर्जही त्यांच्या नावावर आहेत. न्या. बानुमती यांच्या नावावर तामिळनाडूत ३ मालमत्ता आहेत. तर न्या. अशोक भुषण यांच्या नावावर अलाहाबाद येथे शेती आहे. तर त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या नावावर कोणतेही वाहन नाही.