मंडपा ऐवजी झाडाखाली घेतले होते 7 फेरे, अभिनेते परेश रावलनं माजी ‘मिस इंडिया’सोबत मंदिरात केलं होतं लग्न !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडमधील दिग्गज अ‍ॅक्टर परेश रावल आपल्या अदाकारीसाठी ओळखले जातात. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल खूप कमी लोकांना माहित आहे. परेश यांनी माजी मिस इंडिया स्वरूप संपतसोबत लग्न केलं आहे. या लग्नाचीही अजब स्टोरी आहे. स्वरूपचे वडिल इंडियन नॅशनल थिएटरचे प्रोड्युसर होते. परेश मित्रांसोबत एक बंगाली ड्रामा पाहण्यासाठी गेले होते. तिथं त्यांन स्वरूपला पाहिलं आणि पहातच राहिले.

परेश लगेच मित्रांना म्हणून लागले ही मुलगी माझी पत्नी होणार. यावर त्यांचे मित्र म्हणाले, माहित आहे का ही कोणाची मुलगी आहे. यावर परेश म्हणाले, मला फक्त एवढं माहित आहे की, ही माझी पत्नी होणार. स्वरूपनं पहिल्यांदा परेश यांना स्टेजवर सादरीकरण करताना पाहिलं आणि ती त्यांची फॅन झाली.

एकदा स्वरूपनं परेश यांना विचारलं की, तुम्ही कोण आहात. चांगली अ‍ॅक्टींग करता. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. हाच सिलसिला पुढे सुरू राहिला आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. परेश आणि स्वरूप यांचं लग्न मुंबईच्या लक्ष्मीनारायण मंदिरात झालं होतं. तिथं कोणताही मंडप नव्हता आणि जवळपास 9 पंडित मंत्र पठन करत होते. मंडपाऐवजी दोघांनी एका मोठ्या झाडााली सात फेरे घेतले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like