7th Pay Commission | मोदी सरकारने दिले फिटमेंट फॅक्टरबाबत मोठे अपडेट ! इतकी वाढू शकते सरकारी कर्मचार्‍यांची बेसिक सॅलरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी (Government Employees) त्यांचा फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) वाढवण्याची मागणी बर्‍याच काळापासून करत आहेत. फिटमेंट फॅक्टर वाढल्याने कर्मचार्‍यांच्या पगारात (Basic Salary) चांगली वाढ होणार आहे. कर्मचार्‍यांना फिटमेंट फॅक्टरच्या संदर्भात लवकरच चांगली बातमी ऐकू येईल. मीडिया रिपोर्टनुसार, मोदी सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्यासाठी लवकरच मंजुरी देऊ शकते. (7th Pay Commission)

 

सरकारी कर्मचारी फिटमेंट फॅक्टर 2.57 पट वरून 3.68 पट वाढवण्याची मागणी करत आहेत. यामुळे सरकारी कर्मचार्‍यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये होईल.

 

मोदी सरकार (Modi Government) वाढवणार फिटमेंट फॅक्टर
सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची घोषणा केल्यास त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. किंबहुना, फिटमेंट फॅक्टर वाढवल्याने मूळ वेतन वाढेल.

 

सध्या कर्मचार्‍यांना फिटमेंट फॅक्टर अंतर्गत 2.57 टक्के पगार मिळतो, तो 3.68 टक्के वाढवायचा आहे, तर कर्मचार्‍यांच्या मूळ पगारात 8,000 रुपयांची वाढ होईल. याचा अर्थ केंद्र सरकारी कर्मचार्‍यांचे किमान वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये करण्यात येणार आहे. (7th Pay Commission)

 

इतका वाढणार पगार
फिटमेंट फॅक्टर 3.68 पर्यंत वाढवल्यास, कर्मचार्‍यांचे मूळ वेतन 26,000 रुपये होईल.
आत्ता जर तुमचा मूळ पगार रु. 18,000 असेल, तर भत्ते वगळून, तुम्हाला 2.57 फिटमेंट फॅक्टरनुसार रु. 46,260 (18,000 द 2.57 = 46,260) मिळतील.
जर फिटमेंट फॅक्टर 3.68 असेल तर तुमचा पगार 95,680 रुपये (26000द3.68 = 95,680) असेल.

यापूर्वी इतका होता मूळ पगार
केंद्रीय मंत्रिमंडळाने जून 2017 मध्ये 34 सुधारणांसह सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी मंजूर केल्या होत्या.
एंट्री लेव्हल बेसिक पे 7,000 रुपये प्रति महिना वरून 18,000 रुपये करण्यात आला,
तर उच्च स्तरावरील म्हणजेच सचिवाचे वेतन 90,000 रुपयांवरून 2.5 लाख रुपये करण्यात आले.
वर्ग 1 अधिकार्‍यांसाठी, सुरूवातीचे वेतन 56,100 रुपये होते.

 

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission big update on fitment factor government employees basic salary will increase soon pm narendra modi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Samantha Ruth Prabhu Viral Video | आजपर्यंत समंथाची ही बाजू कोणालाच नव्हती ठावूक, अखेर व्हिडिओमुळे झाला खुलासा

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 9000 रुपयांची लाच स्विकारताना उप कोषागार अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

 

Ajit Pawar | ‘गुस्सा क्यू आता है..!’ अजित पवारांनी प्रवीण दरेकरांची उडवली ‘खिल्ली’