7th Pay Commission | मोदी सरकारकडुन दिवाळी दरम्यान ‘या’ कर्मचाऱ्यांना मिऴु शकते मोठी भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मोदी सरकारने (Modi government) महागाई भत्त्यातली वाढ मे 2020 मध्ये दिली नव्हती. दरम्यान, यंदा मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) एक मोठी खुशखबर दिली आहे. दिवाळीला मोदी सरकार (Modi government) आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक भेट देणार आहे. जुलै महिन्यात महागाई भत्त्यात 17 टक्के वाढ करून तो 28 टक्के तर घरभाडे भत्ता 24 टक्क्यांनी वाढवून ते 27 टक्के केला. (7th Pay Commission) आता महागाई भत्ता पुन्हा 3 टक्क्यांनी वाढणार आहे. तो वाढुन 31 टक्के होईल.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना (Central Government Employees) मिळणारा 17 टक्के महागाई भत्ता सरकारने साधारणपणे कोरोनाच्या काळात दीड वर्षं दिला नव्हता. या विषयातील तज्ज्ञांच्या मते, लेव्हल 1 च्या कर्मचाऱ्यांना 11 हजार 880 रुपयांपासून ते 37 हजार 554 रुपयांपर्यंत DA एरियर्स म्हणजेच थकबाकी मिळू शकतात. तसंच पे-स्केल लेव्हल -14 वर असलेल्या कर्मचाऱ्यांना डीएचे 1 लाख 44 हजार 200 ते 2 लाख 18 हजार 200 रुपये मिळू शकतात. दरम्यान, जेसीएमची राष्ट्रीय परिषद, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग तसंच केंद्रीय अर्थ मंत्रालय यांच्या अधिकाऱ्यांची 26 -27 जून 2021 ला बैठक झाली. त्या बैठकीत काय झालं याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Mutual Fund | म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक करता का? तात्काळ करा ‘हे’ काम अन्यथा काढू शकणार नाही तुमचे पैसे; जाणून घ्या

महागाईचा फटका बसू नये म्हणून दिला जातो DA…

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Central Government Employees) वेतनात (Salary) विविध भत्ते
दिले जातात. त्यात महागाई भत्ता दिला जातो. वाढत्या महागाईच्या त्या कुटुंबाला झळ लागू नये म्हणून हा भत्ता
दिला जातो. गतवर्षीच्या तुलनेत यंदा महागाई भत्ता 11 टक्क्यांनी वाढला आहे. सरकारने जुलै 2021 मध्ये तो 28 टक्के केला होता. आता जर त्यात 3 टक्के वाढ झाली तर महागाई भत्ता 31 टक्क्यांवर पोहोचेल. याचंच एक उदाहरण म्हणजे, जर एखाद्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्याचा बेसिक पगार 50 हजार रुपये असेल तर त्याला 15 हजार 500 महागाई भत्ता मिळेल.

दरम्यान, केंद्राप्रमाणेच राज्यांनीही DA वाढवण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, हरियाणा, कर्नाटक, राजस्थान आणि आसाम या राज्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा (State Government employees) DA वाढवण्याचा निर्णय घेतला. देशात वाढत्या महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देते आणि तो भत्ता वेळोवेळी वाढवलाही जातो. दरम्यान, यंदा DA थकबाकी मिळू शकणार आहे. हा भत्ता दिवाळीच्या वेतना दरम्यान मिळु शकते. त्यामुळे ही एक मोदी सरकारची (Modi government) भेट असणार आहे.

हे देखील वाचा

Pankaja Munde | करुणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडेचं ट्विट; म्हणाल्या – ‘परळी सुन्न आहे…’

Kopardi Rape Case | कोपर्डी प्रकरणाची लवकर सुनावणी होण्यासाठी शासनाची उच्च न्यायालयाला विनंती

Parambir Singh Case | चांदीवाल कमीशनने परमबीर सिंह यांच्याविरूद्ध जारी केले वॉरंट

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : 7th Pay Commission | 7th pay commission central government employees will get rs 218200 on diwali check calculation here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update