7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना ‘या’ आठवड्यात मिळू शकते चांगली बातमी, 18 महिन्याच्या थकीत डीए एरियरवर होणार निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना (central government employees ) लवकरच चांगली बातमी मिळणार आहे. वास्तविक, केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ (dearness allowance) आणि 18 महिन्यांसाठी डीएची थकबाकी यावर केंद्र सरकार (central government) या आठवड्यात निर्णय घेऊ शकते. तसे झाल्यास केंद्रीय कर्मचार्‍यांचे पगार तर वाढतीलच, पण थकबाकी मिळण्यापासून दिलासा मिळेल.

 

केंद्र सरकारने कर्मचार्‍यांना 18 महिन्यांची डीएची थकबाकी अद्याप दिलेली नाही. ज्याची कर्मचार्‍यांची अनेक दिवसांपासून मागणी होती. अशा स्थितीत केंद्र सरकारने या आठवड्यात डीएची थकबाकी भरण्याची घोषणा केल्यास कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (7th Pay Commission)

 

डीए थकबाकीवर बराच काळापासून चर्चा –
DA थकबाकीचे रखडलेले पैसे देण्यासाठी केंद्र सरकार आणि कर्मचार्‍यांमध्ये बराच काळ चर्चा सुरू आहे. असे मानले जात आहे की 26 जानेवारीनंतर सरकार केंद्रीय कर्मचार्‍यांना एकवेळ महागाई भत्ता देऊ शकते.

डीए एरियरमधून होईल 2 लाखांचा फायदा –
केंद्र सरकारच्या डीएची थकबाकी देण्याच्या निर्णयामुळे कर्मचार्‍यांना 2 लाख रुपयांपर्यंत फायदा होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये लेव्हल-1 कर्मचार्‍यांना 11,880 ते 35,554 रुपये आणि लेव्हल-13 आणि लेव्हल-14 कर्मचार्‍यांना 1,44,200 ते 2,18,200 रुपये डीए थकबाकी दिली जाऊ शकते.

 

त्याच वेळी, या संदर्भात जेसीएमची राष्ट्रीय परिषद, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि अर्थ मंत्रालय यांच्यात चर्चेच्या अनेक फेर्‍या झाल्या आहेत.
मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. येत्या काही दिवसांत या विषयावर कॅबिनेट सचिवांशी चर्चा होऊ शकते, असे मानले जात आहे. (7th Pay Commission)

 

डीए थकबाकीच्या वन टाइम सेटलमेंटवर होऊ शकतो निर्णय –
नॅशनल कौन्सिल ऑफ कन्सल्टेटिव्ह मशिनरीने सरकारकडे 18 महिन्यांच्या थकित डीएचा एकरकमी निपटारा करण्याची मागणी केली आहे.
सध्या या प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) संमतीची प्रतीक्षा आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ही मागणी मान्य केल्यास केंद्रीय कर्मचार्‍यांच्या खात्यात यावर्षी मोठी रक्कम येऊ शकते.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission decision taken on the outstanding da arrears of 18 months of central employees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Lata Mangeshkar | PM मोदींनी लता मंगेशकर यांची भेट घ्यावी – जगद्गुरु परमहंस आचार्य

 

Gehraiyaan-Ananya Panday | अनन्या पांडेनं घातला एवढा छोटा ड्रेस, पायऱ्यांवरून उतरताना पुन्हा-पुन्हा करावं लागलं ‘अ‍ॅडजस्ट’

 

Insurance Policy Problems | विमा संबंधित तक्रार कुठे आणि कशी कराल? जाणून घ्या सविस्तर