7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठी भेट, सरकार वाढवून ‘इतकी’ करणार बेसिक सॅलरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | अनेक दिवसांपासून फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) वाढवण्याची मागणी करणार्‍या केंद्रीय कर्मचार्‍यांना लवकरच चांगली बातमी मिळू शकते. केंद्र सरकार (Central Government) आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फिटमेंट फॅक्टर वाढवण्यासाठी सरकार लवकरच मान्यता देऊ शकते. (7th Pay Commission)

 

केंद्रीय सरकारी कर्मचारी संघटना दीर्घकाळापासून किमान वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढवण्याची आणि फिटमेंट फॅक्टर 2.57 पट वरून 3.68 पट वाढवण्याची मागणी करत आहे. सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची घोषणा केल्यास त्यांच्या पगारात वाढ होईल. (7th Pay Commission)

 

8,000 रुपयांपर्यंत वाढणार किमान वेतन
फिटमेंट फॅक्टर वाढल्याने किमान वेतनातही वाढ होईल. सध्या कर्मचार्‍यांना फिटमेंट फॅक्टर अंतर्गत 2.57 टक्के पगार मिळतो, तो 3.68 टक्के केला तर कर्मचार्‍यांचे किमान वेतन 8,000 रुपयांनी वाढेल. याचा अर्थ केंद्र सरकारी कर्मचार्‍यांचे किमान वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये करण्यात येणार आहे.

इतका वाढणार पगार
फिटमेंट फॅक्टर 3.68 पर्यंत वाढवल्यास कर्मचार्‍यांचे मूळ वेतन 26,000 रुपये होईल. आत्ता जर तुमचा किमान पगार रु. 18,000 असेल, तर भत्ते वगळून, तुम्हाला 2.57 फिटमेंट फॅक्टरनुसार रु. 46,260 (18,000 X 2.57 = 46,260) मिळतील. आता जर फिटमेंट फॅक्टर 3.68 असेल तर तुमचा पगार 95,680 रुपये असेल (26000X 3.68 = 95,680).

 

पूर्वी इतका होता मूळ पगार
केंद्रीय मंत्रिमंडळाने जून 2017 मध्ये 34 सुधारणांसह सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी मंजूर केल्या होत्या. एंट्री लेव्हल बेसिक पे 7,000 रुपये प्रति महिना वरून 18,000 रुपये करण्यात आला, तर उच्च स्तरावरील म्हणजेच सचिवाचे वेतन 90,000 रुपयांवरून 2.5 लाख रुपये करण्यात आले. वर्ग 1 अधिकार्‍यांसाठी, सुरुवातीचे वेतन 56,100 रुपये होते.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission fitment factor government employees basic salary will increase rupees

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा