7th Pay Commission | ‘या’ कर्मचार्‍यांचा वाढणार पगार, जाणून घ्या – किती रूपयांची होईल वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या (central government employees) सॅलरीत पुन्हा एकदा वाढ (Salary Hike) होण्याची आशा आहे. ऑक्टोबर 2021 च्या दरम्यान कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) आणि प्रवास भत्त्यात (Travel Allowance) वाढ करण्यात आली होती. यावेळी फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) वाढवला जाऊ शकतो. याशिवाय डीए वाढवण्यावर निर्णय सुद्धा लवकर येऊ शकतो. या गोष्टी वाढल्यास कर्मचार्‍यांच्या मासिक पगारात वाढ होऊ शकते. हे वाढल्याने किती फायदा होईल जाणून घेवूयात. (7th Pay Commission)

 

फिटमेंट फॅक्टर वाढू शकतो
7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर 2016 मध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर या कर्मचार्‍यांचे किमान वेतन थेट 6000 रुपयांवरून 18,000 रुपये करण्यात आले.

 

त्यानंतर आजतागायत कर्मचार्‍यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. मात्र, महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यात वाढ झाली. त्याचबरोबर फिटमेंट फॅक्टर तीनपट वाढवावा, अशी मागणी कर्मचार्‍यांची होती.

 

किती वाढेल फिटमेंट फॅक्टर
केंद्र आणि राज्य कर्मचार्‍यांकडून त्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्क्यांवरून 3.68 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी आहे. 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होणार्‍या अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय कर्मचार्‍यांच्या फिटमेंट फॅक्टरबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे. (7th Pay Commission)

 

जर किमान मूळ वेतन 18,000 रुपये असेल तर भत्ते वगळून वेतन 18,000 X 2.57 = 46,260 रुपये असेल. तर 26000 रुपयांच्या 3% किमान मूळ वेतनाच्या आधारावर एकूण 78000 रुपयांपर्यंत वाढ होईल.

 

म्हणजेच तीन टक्के वाढ झाल्यास एकूण 31,740 रुपयांचा लाभ कर्मचार्‍यांना मिळणार आहे. म्हणजेच कर्मचार्‍यांच्या एकूण पगारात 31,740 रुपयांनी वाढ होणार आहे. हे कॅलक्युलेशन किमान मूळ वेतनावर करण्यात आले आहे. जास्तीत जास्त पगार असलेल्यांना अधिक फायद्रा मिळू शकतो.

लवकर वाढू शकतो DA
AICPI निर्देशांकाचा नोव्हेंबरचा डेटा जाहीर झाला आहे, जो 125.7 वर आला आहे. म्हणजेच, महागाई भत्ता अद्याप 33 टक्क्यांपर्यंत पोहोचलेला नाही, ज्यामध्ये 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, डिसेंबरची आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही.

 

अशा स्थितीत या काळातही निर्देशांकात वाढ झाली तर त्यात १ टक्क्याने वाढ होण्याची शक्यता आहे.
म्हणजेच डिसेंबर 2021 पर्यंत CPI (IW) चा आकडा 125 पर्यंत राहिला तर महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढू शकतो.
म्हणजेच, एकूण DA 3% ते 34% वाढेल, जो जानेवारी 2022 पासून दिला जाईल.

 

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission salary of these workers will increase know how much will increase

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona Updates| चिंताजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1500 पेक्षा अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड वाढल्याने ‘या’ आजारांचा वाढू शकतो धोका; जाणून घ्या कसे करावे नियंत्रण

Pune Crime | कर्नाटकातून पुण्यात विक्रीसाठी आणलेला 46 लाखांचा गुटखा हडपसर पोलिसांकडून जप्त