7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या DA बाबत समोर आली मोठी अपडेट, जाणून घ्या सरकारचा काय आहे प्लॅन?

नवी दिल्ली : 7th Pay Commission | डीए (DA) वाढीची मोठ्या कालावधीपासून प्रतिक्षा करत असलेल्या केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी (Central Govt Employees) मोठी बातमी आहे. शनिवारी झालेल्या बैठकीनंतर सध्या कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, मीटिंग खुप पॉझिटिव्ह होती. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी मीटिंगमध्ये सर्व मुद्दे लक्षपूर्वक ऐकले आहेत आणि यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्रीय कॅबिनेट यावर लवकरच एखादा निर्णय घेऊ शकते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मागण्यांवर लक्ष देण्यात आले आहे. महागाई भत्ते लवकरच जारी करण्याची आशा व्यक्त केली जात आहे. तर, कर्मचार्‍यांचा डीए एरियर बाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. आशा आहे की लवकरच यावर केंद्रीय कॅबिनेटकडून निर्णय घेतला जाऊ शकतो.

पीएम मोदी यांच्या समोर ठेवली जाईल मागणी
केंद्रीय कॅबिनेट लवकरच अपला निर्णय सुनावू शकते. यावेळी केंद्रीय कर्मचार्‍यांचा सुमारे 3 हप्त्यांचा डीए थकलेला आहे, त्यावर सरकारने निर्णय घ्यायचा आहे. पंतप्रधान मोदी आणि कॅबिनेटच्या समोर कर्मचार्‍यांची मागणी ठेवली जाईल. मात्र, हे स्पष्ट नाही की कोणत्या कॅबिनेट मीटिंगमध्ये यावर चर्चा होईल.

हे देखील वाचा

Vastu Tips | घरात ठेवलेल्या या 6 वस्तू बनू शकतात तुमच्या आर्थिक तंगीचे कारण, ताबडतोब घरातून बाहेर काढा

Edible oil price | खुशखबर ! स्वस्त झाले खाद्यतेल, मोहरी तेलासह घसरले सर्वांचे दर, पाहून घ्या यादी

Pune News | आज खडकवासला, कोथरुडमध्ये संगणकीकृत सातबारा दुरुस्ती शिबीर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : 7th pay commission central governmnet employees da update know about modi government plan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update