7 वा वेतन आयोग : मोदी सरकार 50 लाखाहून अधिक नोकरदारांना देणार खुशखबर, पगारामध्ये होणार भरघोस वाढ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्र सरकारच्या 50 लाखाहून अधिक कर्मचार्‍यांच्या किमान वेतनात सरकार वाढ करू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते. त्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केल्याचेही सांगितले जात आहे.

आज बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक राजधानी दिल्लीत होणार आहे. या बैठकीनंतर केंद्रीय कर्मचार्‍यांना चांगली बातमी मिळू शकते. माध्यमांच्या अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी कर्मचार्‍यांचे किमान वेतन आठ हजारांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना किमान वेतन म्हणून 18,000 रुपये दिले जातात, जे या निर्णयानंतर वाढून 26,000 रुपये होतील.

बर्‍याच काळापासून केंद्रीय कर्मचारी त्यांच्या मूलभूत पगारामध्ये ही वाढ करण्याची मागणी करत होते. कर्मचार्‍यांच्या म्हणण्यानुसार सध्याची पगार रचना त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अपुरी आहे.

गेल्या महिन्यातही केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्‍यांचे महागाई भत्यामध्ये (डीए) मध्ये पाच टक्क्यांनी वाढ केली होती. या निर्णयाचा फायदा एक कोटी सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना झाला. यापूर्वी कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये 2-3 टक्के वाढ करण्यात आली होती. परंतु यावेळी ती 12 टक्क्यांवरून 17 टक्के करण्यात आली आहे.

Visit :  Policenama.com