CAA विरोधात 80 मुस्लीम नेत्यांचा भाजपचा ‘राजीनामा’

इंदूर : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला देशातून विरोध होत आहे. धर्माच्या आधारे हा कायदा तयार केल्याचा आरोप करत उत्तर प्रदेशातील भाजपच्या 80 मुस्लीम नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. भाजप नेते रजिक कुरेशी फर्शीवाला यांनी आज (शुक्रवारी) ही माहिती दिली. जवळपास 80 मुस्लीम नेत्यांनी आपले राजीनामे भाजपचे नवनिर्वाचीत अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना गुरुवारी (दि.23) पत्राद्वारे पाठवले आहेत. त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले.

सीएए कायद्याच्या विरोधात देशातील अनेक राज्यामध्ये आंदोलने करण्यात येत आहेत. मध्यंतरी या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पंजाब, केरळ या राज्यांनी कायद्याविरोधात ठराव मांडला. तर पश्चिम बंगाल आणि राजस्थान सरकार ठराव मांडणार आहे. आता या कायद्याला विरोध करण्यासाठी मध्य प्रदेशातील 80 मुस्लीम नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच भाजप अध्यक्षांना पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. राजीनामे देणाऱ्यांमध्ये बहुतांश नेते हे अल्पसंख्यांक सेलचे आहेत.

फूट पाडणारा कायदा – कुरेशी
नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा फूट पाडणारा असून याबाबत कधीपर्यंत गप्प बसणार ? अशी विचारणा हेत आहे. केणत्याही समुदायातील पीडित शरणार्थींना भारतीय नागरिकत्व मिळायला पाहिजे. तुम्ही केवळ धर्माच्या आधारे अमूक व्यक्ती घुसखोरी किंवा दहशतवादी आहे हे ठरवू शकत नसल्याचे कुरेशी यांनी म्हटले आहे.

भाजप देशात फूट पाडण्याचे काम करतंय –
सीएए विरोधात 80 नेत्यांनी भाजप अध्यक्ष नड्डा यांना पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये, संविधानातील कलम 14 अंतर्गत कोणत्याही भारतीय नागरिकाला समानतेचा अधिकार आहे. मात्र, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करून देशात फूट पाडण्याचे काम केले असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –