‘डेनमार्क’ आणि ‘न्यूझीलंड’ मध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार, जाणून घ्या यादीतील भारताचं स्थान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भ्रष्टाचार अनुभव निर्देशांकात जगातील 180 देशांपैकी भारताचे 80 वे स्थान आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत ट्रांसपरेंसी इंटरनेशनल संस्थेने हा निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केला. तज्ञ आणि व्यावसायिक लोकांच्या मते, ही निर्देशांक 180 देशांच्या सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराची पातळी दर्शवते. निर्देशांकात डेन्मार्क आणि न्यूझीलंड अव्वल आहेत.

या निर्देशांकात फिनलँड, सिंगापूर, स्वीडन, स्वित्झर्लंड, नॉर्वे, नेदरलँड्स, जर्मनी आणि लक्झेंबर्ग पहिल्या दहामध्ये आहेत.निर्देशांकात 41 गुणांसह भारत 80 व्या स्थानावर आहे. चीन, बेनिन, घाना आणि मोरोक्कोदेखील याच क्रमांकावर आहेत. या निर्देशांकात शेजारील पाकिस्तानचा क्रमांक १२० वा आहे.

कशी होते गणना –
भ्रष्टाचार निर्देशांक तयार करण्यासाठी देशांना 0 ते 100 दरम्यान गुण देण्यात येतात. सर्वात कमी स्कोअर हे सर्वात जास्त भ्रष्टाचाराच्या प्रसंगाचे लक्षण मानले जाते. न्यूझीलंड आणि डेन्मार्क 89 आणि 88 गुणांसह अव्वल स्थानावर आहेत. दुसरीकडे, सीरिया, सुदान आणि सोमालिया अनुक्रमे 14, 12 आणि 9 गुणांसह खाली आहेत.या यादीत चीन 77 वा, ब्राझील 96 व्या आणि रशिया 135 व्या स्थानावर आहे.

आशिया-पॅसिफिक प्रदेशात वाईट परिस्थिती –
ट्रान्सपेरेंसी इंटरनॅशनलने म्हटले आहे की, “आशिया-पॅसिफिक प्रदेशातील काही देशांमध्ये पत्रकार, कार्यकर्ते, विरोधी पक्ष नेते आणि कायद्याची अंमलबजावणी आणि नियामक एजन्सींच्या अधिकाऱ्यांनाही धमक्या दिल्या जातात.” कुठे कुठे परिस्थिती इतकी भयानक आहे की तिथे हत्या देखील केली जाते.

फेसबुक पेज लाईक करा –