‘पद्मभूषण’ने सन्मानित ८३ वर्षाच्या वैज्ञानिकाचा संशयास्पद मृत्यू

कानपूर : वृत्तसंस्था

‘पद्मभूषण’ने सन्मानित ८३ वर्षाचे वैज्ञानिक डॉ. सर्वज्ञ सिंह कटियार यांचा संशयास्पद मृत्यू झाला. पत्नीच्या निधनानंतर कटियार निराश झाले होते. या धक्क्यातूनच त्यांनी विष पिऊन आयुष्य संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’558b82ef-cc4b-11e8-a06a-cd4397e48ea9′]

डॉ. सर्वज्ञ सिंह कटियार हे छत्रपती शाहू महाराज विश्वविद्यालय (सीएसजेएमयू) चे माजी कुलगुरु होते. एंझायमोलॉजी या विषयात त्यांनी नैपुण्य मिळवलं होते. विज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी २००३ मध्ये केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ प्रदान करुन त्यांचा सन्मान केला होता. तर २००९ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ने गौरवण्यात आले होते.

संरक्षणमंत्री सीतारमण यांच्या फ्रान्स दौऱ्यात राफेलवर होणार चर्चा

डॉ. सर्वज्ञ सिंह कटियार यांना जवळपास वीस दिवसांपूर्वी रिजन्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पत्नीच्या निधनानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यातच काकांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या पुतण्याने सांगितले. मात्र कटियार यांनी विषप्राशन केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तेव्हा कटियार यांच्या भाच्याने खोलीत शोधाशोध करुन सुसाईड नोट सापडल्याचे सांगितले.

[amazon_link asins=’B076FFSXRX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bf7ffe3d-cc4b-11e8-96b7-e78982cdfbdf’]

गेल्या वर्षी आजारपणातून पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी मानसिक स्वास्थ्य गमावले होते. त्यामुळे विष पिऊन त्यांनी आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.