पुण्यात पाठीच्या मणक्यातील हाडाची रिप्लेसमेंट सर्जरी यशस्वी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील एक ८५ वर्षीय आजोबा पाठीतील मणक्याच्या टीबीने त्रस्त होते. त्यांच्यावर यशस्वीरित्या सर्जरी करण्यात आली आहे. या आजारामुळं त्यांच्या पाठीच्या मणक्याचं १२वं हाड डॅमेज झालं होतं. ८५ वय असतानाही या आजोबांची सर्जरी यशस्वी झाली असून ते आता स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात.

त्यांचे नाव मोहनलाल राठी असून पाठदुखीची समस्या जाणवू लागल्यानंतर त्यांनी अनेक औषधं घेतली. पण काहीच उपयोग झाला नाही. नंतर तर त्यांना चालणे अवघड झाले, लघवीला त्रासही होऊ लागला. अखेर राठी यांनी पुण्यातील जहांगीर रूग्णालयात जाऊन तेथील डॉक्टरांची भेट घेतली. येथील डॉक्टरांनी त्यांना काही तपासण्या कराण्यास सांगितले. त्यानंतर असे लक्षात आले की त्यांना पाठीतील मणक्यात टीबी झाला आहे. यामुळेच थकवा, पाठदुखीचा त्रास त्यांना होत होता. डॉक्टरांनी त्यांना पाठीवर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. पण, एवढ्या वयात हे ऑपरेशन कसे सहन करणार म्हणून प्रथम कुटुंबियांनी नकार दिला. यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन केले. यानंतर कुटुंबाने शस्त्रक्रियेस होकार दिला.

जहांगीर रूग्णालयातील डॉक्टरांनी तब्बल सात तासांची सर्जरी करत पाठीच्या मणक्यातील डॅमेज झालेलं हाड रिप्लेस केलं. शस्त्रक्रियेनंतर रूग्णाला आयसीयूमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात आलं.

त्यांच्या आजाराचं वेळीच निदान झाल्याने उपचार करणं शक्य झालं. सध्या स्पाईन सर्जरीच्या उपचार अत्याधुनिक झाले आहेत. त्यामुळे या उपचारांमुळे रूग्णावर चांगले परिणाम होतात. विशेषता वृद्धांना या उपचारांचा फायदा चांगला फायदा होतो. शस्त्रक्रियेनंतर राठी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते त्यांना फिजीयोथेरेपीद्वारे उपचार देण्यात आले. आता त्यांना घरी नेण्यात आल्यानंतर रिहॅबिलीटेशन देखील सुरू आहे. टीबीची औषधं देण्यात येत आहेत.राठी यांनी जहांगिरच्या डॉक्टरांचे विशेष आभार मानले आहेत.