Coronavirus ! पुणेकरांचं टेन्शन वाढलं ! 24 तासात 90 नवे रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू, शहरात 1070 ‘कोरोना’बाधित
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कोरना बाधितांची संख्या वाढत असून पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची 1070 झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 73 वर पोहचली आहे. आज पुण्यात 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर पिंपरी चिंचवडमध्ये 1 रुग्णाचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 90 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले असून 13 करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. पुण्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 159 झाली आहे.
पुण्यात दिवसभरात नवे ९० कोरोनाबाधित, एकूण रुग्णसंख्या १०७० !
पुणे शहरात आज दिवसभरात ९० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून शहराची एकूण संख्या १ हजार ०७० झाली आहे. आज नायडू-महापालिका रुग्णालये ७९, ससून ०९ आणि खासगी रुग्णालये ०२ नवे रुग्ण आढळले.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 25, 2020
पुण्यात शनिवारी दिवसभरात 90 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. पुण्यात आज मृत्यू झालेल्यांमध्ये गंजपेठेतील 60 वर्षीय महिला, मार्केटयार्ड येथील 55 महिला, पर्वती येथील 72 वर्षीय पुरुष आणि येरवडा येथील 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
पुण्यातील ४ कोरोनाग्रस्त दगावले !
पुण्यातील ४ कोरोनाग्रस्त रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाला असून यात २ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे.
तपशील
१) गंजपेठ, ६० वर्षीय महिला
२) पर्वती, ७२ वर्षीय पुरुष
३) येरवडा, ४३ वर्षीय पुरुष
४) मार्केटयार्ड, ५५ वर्षीय महिला#PuneFightsCorona— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 25, 2020
पुणे शहरात आज दिवसभरात 90 नवीन रुग्ण आढळून आले असून शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 1070 झाली आहे. आज महापालिकेच्या नायडू रुग्णालयात 79, ससून रुग्णालयात 9 आणि खासगी रुग्णालयात 2 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर आज दिवसभरात 13 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्या आला आहे. त्यामध्ये नायडू हॉस्पीटलमधील 6, सिम्बॉयसिसमधील 2 आणि ससून, सह्याद्री हॉस्पिटल हडपसर, सह्याद्री हॉस्पीटल कर्वे रस्ता, रुबी आणि केईएम मधील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे.
पुण्यातील १३ रुग्ण आज कोरोनामुक्त !
पुणे शहरातील आज १३ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त असून सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नायडू ६, सिम्बॉयोसिस २ आणि ससून, सह्याद्री हडपसर, सह्याद्री कर्वे रस्ता, रुबी आणि केईएम प्रत्येकी १ असा तपशील आहे.#पुणे शहर #कोरोनामुक्त : १५९
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 25, 2020