राज्यातील ‘जिम’ आणि ‘सलून’ सुरू करण्याबाबत ठाकरे सरकारनं घेतला मोठा निर्णय !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. दरम्यान, कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये जिम आणि सलून बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आलेला होता. मात्र, आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिम आणि सलून सुरू करण्याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आठवडयाभरात राज्यातील जिम आणि सलून काही अटींवर सुरू करण्यास सरकारनं परवानगी दिली आहे.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी जिम आणि सलून या आठवडयात सुरू होईल अशी माहिती दिली आहे. दरम्यान, नाभिक समाजाकडून सलून चालू करण्याच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलने झाले होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील सलून व्यावसायिकांचा त्यांचा व्यावसाय सुरू करू द्यावा अशी मागणी सरकारकडे केली होती. अखेर राज्य सरकारनं काही अटी व शर्थींवर राज्यातील जिम आणि सलून चालू करण्यास परवानगी दिली आहे. आठवडयाभरात जिम आणि सलून सुरू करण्यास सरकारनं परवानगी दिली आहे.