महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी ‘एलियन’सारखे दिसणारे मूल जन्मल्याने प्रचंड खळबळ, डॉक्टर म्हणतात…

गडचिरोली : पोलिसनामा ऑनलाईन – गडचिरोली जिल्ह्यातील एका सरकारी दवाखान्यात एक विचित्र बाळ जन्मले आहे. बाळ एलियनसारखे दिसत असून यामुळे खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एक गर्भवती महिला जिह्यातील महिला रुग्णालयात डिलिव्हरीसाठी दाखल झाली होती. मात्र डिलिव्हरी झाल्यानंतर डॉक्टर जन्मलेले मूल पाहून थक्क झाले. ३ लाख मुलांमध्ये अशा पद्धतीने जन्म घेणाऱ्या या मुलाला ‘हार्लेक्विन डिजीस नावाचा आजार आहे.

या आजारांमध्ये वाचण्याची शक्यता खूप कमी असल्याची माहिती डॉक्टरांनी या बाळाविषयी बोलताना दिली आहे. या आजाराला डॉक्टरांनी ‘हरलिक्विन सिंड्रोम’ म्हटले आहे. या आजारात मुलांची त्वचा खूप जाड असते. डॉक्टरांनी या आजाराला अनुवांशिक सांगितले आहे. आरोग्य विभागाची एक टीम या मुलावर लक्ष ठेवून आहे. याविषयी बोलताना जिल्हा रुग्णालयातील अधीक्षक डॉ. दीपचंद श्याम म्हणाले कि, हा एक अनुवांशिक आजार असून सरासरी तीन लाख मुलांमध्ये एकाला हा होत असतो.

दरम्यान, या आजारात मुलांची वाचण्याची शक्यता फक्त १० टक्के असते. त्यामुळे आता हे बाळ किती दिवस जगते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर मेडिकल क्षेत्रातील हि फार दुर्मिळ घटना असल्याचे देखील डॉक्टरांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –