भोकरच्या शिवसाई गॅस एजन्सी विरोधात ग्राहकांची उपविभागीय अधिकाऱ्याकडे तक्रार

भोकर | पोलीसनामा आॅनलाईन

 

माधव मेकेवाड

भोकर मध्ये नामांकित असलेली शिवसाई गॅस एजन्सी (भारत गॅस) केंद्र गंदेवार कॉलनी भोकर येथे आहे. अधिकृत विक्रते यांच्या सांगण्यावरून सर्रासपणे ग्राहकांची आर्थिक लूट करताना भोकर शहरात दिसुन आले आहे.  एकिकडे शासनाने इंधन दर गगनाला भिडेपर्यंत जादा केले असून दुसरीकडे अधिकृत गॅस एजन्सी धारक ग्राहकांची पावतीनिहाय रक्कम मागणी करून मनमानी चालवली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’adad99be-ce24-11e8-be8b-13f85c522e52′]

भोकर तालुक्यातील जनतेला शिव साई गॅस एजन्सीचा आता अतोनात  त्रास जाणवायला लागला आहे. शासनाने घालून दिलेले कुठलेच नियम ते लागू करत नाहीत, असे दिसून येत आहे. तब्बल 24 रुपये जास्तीचे ग्राहकांना द्यावेच लागतात. असा तगादा लावून सक्तीने वसूल करताना शिवसाई गॅस एजन्सी चे कर्मचारी दिसून येत असतात. त्यांना याबद्दल विचारले असता आमच्या मालकाने सांगितले आहे, ते स्पष्ट सांगतात.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b56d8c9c-ce24-11e8-8d59-c990fb17f363′]

शासनाने नियम असे घालून दिले की ज्या ग्राहकांना गॅस त्वरित पाहिजे त्यांनी जर गोडाऊन वरून स्वतः नेत असतील तर त्यांना २० रुपये नगद गॅस एजन्सी च्या मालकाने द्यावे असे न करता ते सरास लूट करत आहेत. जनतेच्या डोळ्यात धूळ टाकून हे काम चालू आहे. अशा कामास त्वरित आळा बसावा म्हणजे जनतेचे लूट थांबेल, असा सूर नागरिकांमधून निघत आहे.

बाल सुधारगृहातून पाच अल्पवयीन मुलांचे अपहरण

भारत गॅस चे ग्राहक एजास कुरेशी यांना तर ९०६ रुपये ची पावती करून देऊन तब्बल ९३० रुपये घेतले. त्यामुळे अशी बाब लक्ष्यात आली. सदर रक्कमेचा दिवसाचा विचार केला असता, अनेक ग्राहकाचे मिळून हजारो रुपये जमा होतात. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कायमस्वरूपी परवाना रद्द करा व त्या अधिकृत गॅस धारकवर कार्यवाही करा. असे निवेदन शेख एजास शेख महेबूब यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना दिले आहे. ते अधिकारी यावर काय कार्यवाही करतात याकडे भोकर तालुक्यातील लोकांचे लक्ष वेधून आहे.

[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cb77ca7f-ce24-11e8-b6f7-4b6adac65d48′]

पोलिसनामाचा प्रतिनिधी म्हणून अधिकृत धारकाला विचारले असता त्यांनी सांगितले की सदरील ग्राहकाला आम्ही पैसे देऊ नका म्हणून सांगितले आहेत. त्यांची स्व-इच्छा असते असे यावेळी अशोक नेम्मानीवार यांनी सांगितले.