७ कोटींच्या कोकेनसह परदेशी तरुणीला विमातळवर बेड्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोकेनची तस्करी करणाऱ्या एका २० वर्षीय ब्राझिलियन तरुणीला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन अटक करण्यात आली. तिच्याकडून सात कोटी रुपयांचे सव्वा किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी केली.

रिबेका अलेक्‍झान्ड्रा मेन्डेस असे अटक तरुणीचे नाव असून ती ब्राझीलमधील रहिवासी आहे. मुंबई विमानतळावर एक तरुणी अंमली पदर्थासह येणार असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना समजली होती. त्यानुसार एनसीबीचे अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. रिबेका नावाची तरुणी विमानतळावर आली असता अधिकाऱ्यांनी तिच्या बॅगेची तपासणी केली. त्यावेळी बॅगेमध्ये पांढऱ्या रंगाची पाडवर अधिकाऱ्यांना सापडली.

अधिकाऱ्यांनी पांढऱ्या रंगाच्या पवाडरची प्राथमिक चाचणी केली असता ते कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. या तरुणीकडून १ किलो १८० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. यामागे आंतरराष्ट्रीय तस्करांचा हात असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तिने हे कोकेन कोणासाठी आणले होते याचा तपास एनसीबीचे अधिकारी करीत आहेत.