अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला ७ वर्षांचा सश्रम कारावास

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन

सोळा वर्षीय अल्पवयीन तरुणीवर घरात घुसून अत्याचार केल्याची घटना काजूवाडी परिसरात २ ऑक्टोंबर २०१५ रोजी घडली होती. या प्रकरणी आरोपी देवेंद्र गुप्ता (३१) याला ठाणे जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. पी. जाधव यांनी ७ वर्षांचा सश्रम कारावास आणि १५ हजाराचा दंड तसेच एका वर्षाचा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. अत्याचाराच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलीची संमती कायद्यात नसते असेही न्यायालयाने यावेळी म्हटले.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e59287e4-c150-11e8-a345-072baa5d3e2b’]
महाविद्यालयात शिकणारी १६ वर्षीय तरुणी ही काजूवाडी परिसरात आई-वडील आणि भावासोबत राहते. २ ऑक्टोंबर २०१५ रोजी तिच्या घरातील सदस्य हे कामानिमित्त बाहेर गेले होते. तर अल्पवयीन मुलगी घरात एकटीच होती. याच परिसरात राहणार आरोपी देवेंद्र गुप्ता याने मुलीच्या घरात प्रवेश केला आणि दरवाजा बंद करुन मुलीवर अत्याचार केला. अत्याचारानंतर मुलीच्या आईने दरवाजा ठोठावला. त्याचवेळी आरोपी गुप्ता हा घाबरला आणि स्वतः लपण्याच्या प्रयत्न करू लागला. मात्र पिडीत मुलीने दरवाजा उघडला आणि आईला घडलेला प्रकार सांगण्यापूर्वीच आसपासचे शेजारी जमले. त्यांनी आरोपी देवेंद्र गुप्ताला पकडून ठेवत चोप दिला आणि पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात आरोपीला दिले. वर्तकनगर पोलीस ठाण्यात यासंबंधी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8a9e2885-c152-11e8-b55a-058434e6ea52′]
या प्रकरणी अंतिम सुनावणीसाठी ठाणे जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती पी पी जाधव यांच्या न्यायालयात होते. सरकारी वकिलांचा युक्तीवाद आणि बचाव पक्षाचा युक्तीवादानंतर न्यायमूर्ती जाधव म्हणाले, आरोपी देवेंद्र गुप्ता याने जाणीवपूर्वक तरुणीच्या घरात शिरून अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार केला. अत्याचाराच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलीची संमती कायद्याच्या दृष्टिकोनातून नसते. आरोपी गुप्ताने जाणीवपूर्वक आणि उद्देशाने घरात घुसून दरवाजा बंद करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यामुळे न्यायालयासमोरील साक्षी पुरावे ग्राह्य धरत आरोपी देवेंद्र गुप्ता याला अत्याचार प्रकरणी ७ वर्षाचा सश्रम कारावास आणि घरात घुसल्या प्रकरणी १ वर्षाचा कारावास आणि १५ हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली. या दोन्ही शिक्षा आरोपीने एकाच वेळी भोगायच्या आहेत.