Diabetes : झोपेतून जागे होताच ओळखा डायबिटीजची वॉर्निंग साइन, तुम्हाला तर नाही ना ही समस्या ?, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – टाइप-2 डायबिटीज एक अतिशय धोकादायक आजार आहे. सामान्यपणे याचे लक्षण तोपर्यंत दिसून येत नाही, जोपर्यंत ब्लड लागोपाठ हाय लेव्हलवर असत नाही. हे अतिशय चिंताजनक आहे, कारण हाय ब्लड शुगरची लेव्हल सतत वाढत राहिल्याने हार्ट डिसीजचा धोका वाढू शकतो. मात्र, शरीरात काही अतिशय छोटे बदल टाइप-2 डायबिटीजच्या धोक्याचा संकेत देऊ शकतात. सकाळी झोपेतून जागे झाल्यानंतर तुम्हाला याची लक्षणे सुद्धा दिसून येऊ शकतात.

डायबिटीज, लिपिड डिसॉर्डर आणि एंडोक्रिनोलॉजीचे कन्सल्टंट डॉ. राल्फ अब्राहम यांनी Express.co.uk शी केलेल्या चर्चेत डायबिटीजचे काही खास संकेत दर्शवले आहेत. डॉ. अब्राहम यांच्यानुसार, तोंड कोरडे पडणे याचे प्रमुख लक्षण असू शकते. जर तुम्ही रात्रीत वारंवार लघवीसाठी उठत असाल किंवा खुप जास्त तहान लागत असेल तर तुमच्यात काहीतरी गडबड आवश्य जाणवेल.

त्यांनी सांगितले, तहान आणि डायबिटीजमध्ये खुप जास्त लघवी रक्तात ग्लुकोजची मात्रा वाढल्याने होते. डॉ. अब्राहम यांनी इशारा देताना म्हटले की, जर सकाळच्या वेळी तुमचे तोंड आणि गळा कोरडा पडत असेल तर तुम्हाला अलर्ट झाले पाहिजे. हा टाइप-2 डायबिटीजचा संकेत असू शकतो.

डॉ. अब्राहम यांच्यानुसार, टाइप-2 डायबिटीजची आणखीही अनेक छोटी मोठी लक्षणे आहेत, ज्यांच्यामुळे आजाराला सायलेंट किलर म्हटले जाते. यामध्ये थकवा, आळस येणे, डोळ्यांनी धूसर दिसणे, सेक्सशी संबंधीत समस्या, छोट्या जखमा उशीराने भरणे, फंगल इन्फेक्शन आणि शरीरावर दाणे किंवा फोड येणे या लक्षणांचा समावेश आहे.

नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, जर तुम्हाला टाइप-2 डायबिटीजची लक्षणे दिसत असतील आणि याबाबत चिंतेत असाल तर तुम्हाला ताबडतोब जनरल प्रॅक्टिशनरकडून तपासणी करून घेतली पाहिजे. जनरल प्रॅक्टिशनर या आजाराचे निदान करू शकतात. यासाठी एक ब्लड टेस्ट रिपोर्ट आवश्यक असेल.

आजाराचे निदान झाल्यानंतर तुम्हाला ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यासाठी लाइफस्टाइलमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. ब्लड शुगर मॅनेजमेंटमध्ये डाएटचा एक खास रोल असतो आणि तांत्रिकदृष्ट्या असे काहीही नाही जे तुम्ही खाऊ शकत नाही. मात्र, तुम्हाला कार्बोहायड्रेडच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे लागेल, जे ब्लड शुगर लेव्हल वाढवण्याचे काम करते.