मोबाइलवर बोलताना सातव्या मजल्यावरून पडून आयआयटीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

हैद्राबाद : वृत्तसंस्था – इमारतीच्या सातव्या मजल्यावर मोबइलवर बोलत असताना गच्चीवरुन खाली पडून आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हा विद्यार्थी हैद्राबाद येथे आयआयटी चे शिक्षण घेत होता. रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी मित्राचा कॉल आला मित्राशीच फोनवर बोलत असताना ही दुर्घटना घडली. सुरुवातील ही आत्महत्या असावी असा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र नंतर ही दुर्घटना असल्याचं सिद्ध झालं.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अनिरुद्ध मेकॅनिकल अॅण्ड एरोस्पेस इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. अनिरुद्ध रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी मित्राचा मोबाइल वर फोन आला असता तो गच्चीवर गेला होता. यावेळी तेथून खाली पडून त्याचा मृत्यू झाला.

याबाबत पोलीस उप-निरीक्षक श्रीकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार,‘सुरुवातीला आम्हाला ही आत्महत्या असल्याचा संशय होता. पण जवळच्या एका सीसीटीव्हीत दिसत असल्याप्रमाणे मोबाइलवर बोलत असताना त्याचा तोल गेला आणि खाली पडला. दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला’, अशी माहिती श्रीकांत यांनी दिली आहे.

दरम्यान, मित्रांकडे चौकशी केली असता अनिरुद्ध नेहमी टॅबवर पुस्तकं वाचण्यासाठी आणि मोबाइलवर बोलण्यासाठी गच्चीवर जात असे अशी माहिती दिली. अनिरुद्धच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला आहे. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला.

You might also like