आठवड्यापूर्वीच ‘त्यांनी’ नातेवाईक आणि जवळच्या मित्रांची घेतली भेट

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन
महाराष्ट्र पोलिस खात्यातील दबंग अधिकारी हिमांशु रॉय यांनी आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपूर्वी सर्व कुटुंबीयांची व जवळच्या मित्रांची भेट घेतली होती. त्यांची भेट घेतल्यावर ते म्हणाले होते की,” माझे तुमच्या सर्वांवर खूप प्रेम आहे मला सगळ्यांना मिठी मारायची आहे.” हाडाच्याकर्करोगाने त्रस्त असलेले रॉय यांनी आत्महत्येपूर्वी सहा ओळींची सुसाईड नोट लिहिली होती. त्यांच्या मृत्यूबद्दल कोणालाही दोषी धरू नये असे त्यात लिहिले होते. रॉय यांनी जेव्हा आत्महत्या केली तेव्हा त्यांची पत्नी हॉल मध्ये होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,”रॉय खुर्चीत बसले होते. तेव्हा त्यांनी रिव्हॉल्व्हर काढली आणि स्वत:च्या तोंडात रिव्हॉल्व्हर घालून गोळी झाडली. त्यांना तत्काळ दवाखान्यात नेण्यात आले होते मात्र ‘बॉम्बे हॉस्पिटल’ येथील डॉक्टर गौतम भन्साळी त्यांना मृत घोषित केले. त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा जास्त खालावली होती. ते कमकुवत दिसत होते.

संबंधित घडामोडी:
कसाबच्या फाशीत रॉय यांचा मोलाचा वाटा
नैराश्येतूनच हिमांशु रॉय यांची आत्महत्या
हिमांशू रॉय : एक दबंग पोलीस अधिकारी
अप्पर पोलिस महासंचालक हिमांशु रॉय यांची आत्महत्या