‘या’ कारणामुळे महिलेने केली सरकारी अधिकाऱ्याची चपलेने धुलाई (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशमध्ये पंतप्रधान आवास योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ग्वालियरमध्ये या योजनेंतर्गत घरांच्या वाटपामध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणी एका महिलेने सरकारी अधिकाऱ्याला चप्पलेने मारल्याचा प्रकार घडला आहे.

या प्रकारचा निषेध करण्यासाठी काही महिला जमल्या होत्या. यावेळी या महिलेचा एका अधिकाऱ्यांबरोबर वाद झाला, त्यामुळे या महिलेने या अधिकाऱ्याची चपलेने चांगलीच धुलाई केली. यासंदर्भातील एक व्हिडीओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये मारहाण होताना दिसत आहे. त्याचवेळी एक व्यक्ती वाचवण्यासाठी पुढे आला असता महिलांनी त्याच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरु असलेला दिसून येत असून यामध्ये मी फॉर्म भरला असल्याचा महिलेचा आवाज देखील येत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर आता या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

visit : Policenama.com