काय सांगता ! होय, ‘एवढं’ निंदनीय अडनाव की साधा नोकरीचा अर्ज देखील स्विकारला जात नाही, वाचून तुम्ही देखील…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही व्यक्तीला आडनाव त्यांच्या जन्मानंतर त्याच्या आईवडिल, कुटुंब किंवा समुदायाकडून मिळते. पण आसाममध्ये महिलेचे आडनाव तिच्यासाठी अडचण बनले आणि तिच्या नोकरीचा अर्ज नाकारला गेला. दरम्यान, गुवाहाटीची रहिवासी प्रियंका नॅशनल सीड कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएससीएल) या सरकारी कंपनीत नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा प्रयत्न करीत होती, परंतु चुतिया टायटल असल्याने वेबसाइट आणि सॉफ्टवेअरने तिचा अर्ज नाकारला होता. प्रियंका पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिली, परंतु ती निराश झाली कारण सॉफ्टवेअर त्या आडनावाला नाकारत होता आणि त्यांना स्लॅग वापरू नका असे सांगत होता. यानंतर प्रियंकाने फेसबुकवर आपला राग काढला. ती म्हणाली की आडनाव असल्यामुळे ती मुलाखतीत जिथे जिथे जाते तिथे तिचे नाव ऐकून प्रथम लोक हसायला लागतात.

प्रियंकाने फेसबुकवर लिहिले की, सरकारी कंपनीत तिचा जॉब अर्ज वारंवार रद्द केला जात आहे, कारण वेबसाइट तिचे योग्य आडनाव वापरण्यास सांगत आहे. तिने लिहिले की, मला खूप वाईट वाटते आणि लोकांना सांगून मला कंटाळा आला आहे. त्यांचे आडनाव हा निंदनीय शब्द नाही, तर ते ज्या समुदायाकडून येतात, ते त्याचे टायटल आहे. प्रियंकाने सोशल मीडियावर अनावश्यक वादविवाद सोडत आपल्या समाजातील लोकांनाही या विषयावर काम करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, खासगी (एनएससीएल) तक्रार दिल्यानंतर कंपनीच्या वतीने त्यांचा जॉब अर्ज स्वीकारला गेला. विशेष म्हणजे आसाममध्ये आदिवासी जमात आहे ज्यांचे आडनाव चुतिया आणि सुतिया आहेत. आसाममध्ये राहणारा हा आदिवासींचा समुदाय मूळत: मंगोलियाच्या चीन-तिबेटियन घराण्याचा वंशज मानला जातो.