Aadhar Card Verify | फसवणूक टाळण्यासाठी ड्रायव्हर, नोकर, भाडेकरूचं आधार कार्ड Verify कसं कराल? जाणून घ्या एकदम सोपी प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhar Card Verify | आधार कार्ड (Aadhaar card Verify) हे एक दस्तऐवज अतिशय महत्वाचं झालं आहे. खासगी आणि सरकारी कार्यात ते अगदी उपयुक्त असे दस्तऐवज आहे. दरम्यान, आता घरात नवीन भाडेकरू ठेवताना, एखादा नोकर अथवा ड्रायव्हरला काम देताना संबंधित व्यक्तीची ओळख असणे आवश्यक असते. मात्र समोरची व्यक्ती बनावट महिती सांगत नाही ना? हे शोधणे अतिशय सोपी प्रोसेस आहे. तर, आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI ने नागरिकांना आधार व्हेरिफाय करण्याची पद्धत सांगितली आहे. युआयडीएआय ने महत्वाची माहिती देताना म्हटलं आहे की, सर्व 12 आकडी क्रमांक आधार नंबर सत नाही. काही वेळा खोटा आधार क्रमांक (Aadhaar card) सांगून फसवणूक होऊ शकते. पुढच्यांशी ओळख योग्य आहे का? हे तुम्ही आधारद्वारे जाणून घेऊ शकता. आधार कार्डद्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत युआयडीएआयने इशारा दिला आहे.

UIDAI सूचना –

आधार कार्ड (Aadhaar card) हे कार्डधारकाची ओळख म्हणून स्विकार करण्यापूर्वी ते व्हेरिफाय करा.

तुम्ही Aadhar Card व्हेरिफिकेशनची प्रक्रिया ऑनलाइन करू शकता.

सोपी पद्धत वापरून हे काम करता येईल.

तुम्हाला याकरता UIDAI च्या वेबसाइट वर जावे लागणार आहे.

असे करा आधार (Aadhaar card) व्हेरिफाय –

सर्वात आधी resident.uidai.gov.in/verify या लिंकला भेट द्या.

याठिकाणी 12 अंकी आधार क्रमांक एंटर करा.

त्यानंतर सुरक्षा कोड आणि कॅप्चा प्रविष्ट करा.

Proceed to Verify या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर लगेच 12 अंकी आधार क्रमांकाचे व्हेरिफिकेशन स्क्रीनवर उपलब्ध होईल.

Web Title :- Aadhar Card Verify | aadhaar card update how to verify aadhaar card details of domestic worker driver

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Pune Deccan Queen | मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस विशेष ट्रेनमध्ये व्हिस्टाडोम कोच, 8 ऑगस्टपासून बुकिंग सुरु

Ulhasnagar Corporation | शिवसेना महिला सभापतींना चक्क धमकीचे पत्र, उल्हासनगर महापालिकेत प्रचंड खळबळ

Tokyo Olympic 2020 | भारताचा स्टार भालाफेक नीरजने लिहीला सुवर्ण इतिहास