Aaditya Thackeray | आदित्य ठाकरे शिंदे गटावर संतापले, ”गद्दार गँग, पक्षचोर, बापचोर…”

मुंबई : Aaditya Thackeray | काल मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर (Balasaheb Thackeray Memorial) ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटात (Shinde Group) राडा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अभिवादन करण्यासाठी आले असताना हा प्रकार घडला. यानंतर वातावरण तणावपूर्ण झाल्याने परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, या राड्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी या घटनेमुळे संतापून शिंदे गटाला सुनावले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, ही एक दुर्दैवी घटना आहे. कारण जी गद्दार गँग आहे, जे घाबरले आहेत जे बाप चोरत पक्ष चोरणारे लोक आहेत. जे गुजरात आणि गुवाहाटीला पळून गेले त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. आधी त्यांचा फोटो वापरुन, आमचा पक्ष वापरून, नाव वापरुन स्वतःसाठी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांचे प्रश्न तसेच भिजत पडले आहेत.

ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी म्हटले की, नवी मुंबई मेट्रो (Navi Mumbai Metro) सुरु झालेली नाही. डिलायल रस्ता सुरु झालेला नाही. बिल्डर पालकमंत्र्यांकडे वेळ नसावा. जनतेकडे लक्ष द्यायचे नाही. महाराष्ट्रात आल्यानंतर दंगली घडवायच्या,
वातावरण बिघडवायचे, उद्योग गुजरातला धाडायचे हे सगळे मिंधे सरकारमध्ये सुरु आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, ज्यांना वाटले असेल की डरपोक आणि गद्दार लोक येऊ नयेत त्यांनी घोषणा दिल्या असतील
त्यात गैर काय? ज्या सरकारने छत्रपती शिवरायांच्या मूर्ती असलेल्या शाखेवर हातोडा मारणे, बाळासाहेब ठाकरेंचा
फोटो असलेला बॅनर फाडणे या गोष्टी केल्या आहेत त्यांना काय अधिकार आहे स्मृती स्थळावर जाण्याचा अधिकार काय?
महाराष्ट्र या सगळ्यांनाच चांगले उत्तर देणार आहे. निवडणुका लागू द्या त्यांना उत्तर मिळेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार आज ओबीसींच्या मंचावर, म्हणाले – ”समाजाच्या हक्कासाठी मी सभेला जातोय”