Aaditya Thackeray | शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरीतील ‘मातोश्री’ उल्लेखावरुन आदित्य ठाकरे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aaditya Thackeray | मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (BMC Standing Committee Chairman Yashwant Jadhav) यांच्याकडे 25 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाच्या (Incom Tax Department) छापेमारीत (IT Raid) काही महत्त्वाचे पुरावे सापडले. त्यामध्ये कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरीही (Yashwant Jadhav Diary) विभागाला सापडली. या डायरीत मातोश्रीला (Matoshree) दोन कोटी आणि 50 लाखांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख आहे (Shivsena). त्यामुळे या मातोश्री कोण ? यावरून राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, यावरुन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

 

कोकण (Konkan) दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना यशवंत जाधवांच्या डायरीतील ‘मातोश्री’ उल्लेखावर प्रश्न विचारला. त्यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, की ”अफवांवर किती बोलायचं आणि अधिकृत गोष्टींवर किती बोलायचं यापुरतं मी मर्यादित ठेवतो.’ तर, “आत्ताच्या काळात अफवा किती पसरवल्या जात आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. खूप गैरप्रकार सुरु आहे. यंत्रणा तर आहेत, पण अफवांच्या बातम्या पाठवल्या जात असून त्यात मी जाणार नाही. अधिकृत गोष्टी समोर येतील. पण बदनामीच्या आणि अफवांच्या मुद्द्यावर मी भाष्य करणार नसल्याचं,” ते म्हणाले.

 

”हे राजकीय षडयंत्र आहे. ज्या राज्यात भाजपाचं सरकार नाही. तिथे या गोष्टी सुरु आहेत. न घाबरता या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे. टक्कर द्यायला महाराष्ट्र सज्ज आहे. बंगाल, महाराष्ट्र जिथे जिथे यंत्रणा मागे लागत आहेत तिथे तोंडावर पडत आहेत. राजकारण एके ठिकाणी पण जे घाणेरडं राजकारण सुरु आहे. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. ही महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती नाही. लोकं सरकार बनवत असतात, पाडत असतात पण जे नैराश्य येतं त्यातून हे सुडाचं राजकारण सुरु असून महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे.” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “गेल्या दोन अडीच वर्षात ज्याप्रकारे भाजपा सर्व पक्षांना वागणूक देत असल्याचं पाहिलं आहे.
वाढती महागाई, बेरोजगारी लपवण्यासाठी यंत्रणा तसंच हे विषय समोर आणले जात आहेत का ? हाही प्रश्न आहे.
हे राजकारणापेक्षा मोठे विषय असून त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कामं, विकास करत राहणं गरजेचं असल्याचं,” ते म्हणाले.

 

Web Title :- Aaditya Thackeray | Aaditya thackeray on shivsena leader yashwant jadhav diary mentioning matoshree it raid

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा