Aaditya Thackeray | ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट; वाचून दाखवला महायुती सरकारच्या तक्रारींचा पाढा

पोलीसनामा ऑनलाइन – Aaditya Thackeray | मराठा आरक्षण आंदोलनावर (Maratha Reservation Protest) राज्यामध्ये राजकारण पेटले आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेंकावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहे. दरम्यान जालन्यामध्ये उपोषणाला बसलेले मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा आज उपोषणाचा 9 वा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या अध्यादेश येई पर्यंत उपोषण सोडणार नाही असा निश्चय त्यांनी केला असून आज त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकराने अद्याप सोडवला नाही आणि आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची देखील जबाबदारी न घेतल्यामुळे शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray Group) आक्रमक झाला आहे. आंदोलनाच्या सर्व मुद्यांसह ठाकरे गट व त्यांचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मराठा आरक्षण आंदोलन हे आता तीव्र झाले असून राज्यभर याचे पडसाद उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, “आज आमचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं आणि आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ज्या दिवशी जालन्यात लाठीचार्ज झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेचे कार्यकर्ते जालना या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणी हरीपाठ सुरु होता, मंदिराच्या बाजूला आंदोलन सुरु होतं. ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम (Shasan Aplya Dari Yojana) घ्यायचा म्हणून लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्ज करण्याची काहीही गरज नव्हती. अडीच वर्षे आम्हीही जवळून सरकार पाहिलं आहे. मुख्यमंत्री कार्यालय कसं चालतं हे पण आम्हाला माहित आहे.” असे मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केले.

पुढे ते म्हणाले की, “मराठा आंदोलनासारखा जेव्हा संवेदनशील विषय असतो तेव्हा पोलीस हे कधीही आंदोलनावर अशा प्रकारचा लाठीचार्ज करणार नाहीत, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. अशा आंदोलनांमध्ये लाठीचार्ज झाला तर आजबाजूची कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे ती चिघळू शकते. आता या सगळ्यांकडून जर हे सांगितलं जातं आहे की आम्ही आदेश दिलेच नाहीत, असं असेल तर सरकार कसं काय चाललंय? आज मी राज्यपालांना विनंती केली की हे सरकार चालतं कसं याविषयी मुख्यमंत्र्यांना बोलवून समज द्यावी. सगळीकडे असाच अंदाधुंद सरकारी कारभार चालू असल्याचा घणाघात आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर केला आहे.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जबद्दल जाहीर माफी मागितली मात्र
राज्य सरकार झालेल्या लाठीचार्जची जबाबदारी घेत नसल्याचे दिसून येत आहे.
पुढे सरकार याबाबत काय कारवाई करणार याचा पाढा देखील आदित्य ठाकरेंनी वाचून दाखवला आहे.
ते म्हणाले की, “महत्त्वाची बाब हीच आहे की आपल्या राज्यात एक घटनाबाह्य गद्दार मुख्मयंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री
या तिघांमधला जनरल डायर कोण आहे? ज्यांनी हे लाठीचार्जचे आदेश दिले हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे.
कारण होणार काय ते तुम्हाला आत्ताच सांगतो.

चौकशी समिती बसवली जाईल, एखाद्या आयएस अधिकाऱ्याला निलंबित केलं जाईल.
लाठीचार्ज ज्यांनी केला त्यांच्यावर कारवाई होईल पण आदेश देणाऱ्यांवर काहीही कारवाई होणार नाही.
आज आम्ही शिष्टमंडळ घेऊन राज्यपालांना भेटलो आता त्यांच्याकडून पुढे कारवाई होईल ही अपेक्षा आहे.
मात्र या गोष्टी होत असताना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जर थोडी लाज उरली असेल तर राजीनामा द्यावा कारण असं
सरकार चालत नाही. हे आम्हाला माहित नव्हतं, आम्ही हे आदेश दिलेच नाहीत यांनी जरा सरकार, प्रशासन कसं चालतं
याचं शिक्षण घ्यावं.” अशा शब्दामध्ये आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) राज्य सरकारमधील शिंदे,
फडणवीस व पवार (Ajit Pawar) या तिघांवर हल्लाबोल केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation Protest | मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांचा विरोध; राज्य सरकारला दिला इशारा

MHADA Pune Lottery | म्हाडातर्फे 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात

Pune Dahi Handi – Traffic Updates | पुण्यात दहिहंडी उत्सावानिमित्त वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग