Aaditya Thackeray | शिवसेना-भाजप युती ? आदित्य ठाकरे यांचे मोठे विधान, म्हणाले-‘पुढील काळात भाजपसोबत…’

कुडाळ : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते (Shivsena Leader) आणि राज्याचे पर्यावरण मंत्री (Environment Minister) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी भाजपसोबतच्या (BJP) युतीबाबत (Alliance) मोठे विधान केले आहे. ‘त्यांच्याकडून जी वागणूक येतंय. त्यामुळे मैत्री होणार की नाही हा दुसरा भाग आहे. मुळात आपल्यावर अन्याय करत असाल तर मैत्रीचा विषय येतो कुठे ?’ असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे (Aaditya Thackera) यांनी भाजपसोबत युतीच्या चर्चेला पूर्ण विराम दिला आहे.

 

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) सध्या सिंधुदुर्गच्या (Sindhudurg) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य करताना भाजपवर निशाणा साधला.

 

भाजप युतीबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांच्याकडून जी वागणूक दिली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना (Central Investigation Agency) हाताशी धरुन कुटुंबावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे मैत्री (Friendship) होणार की नाही हा दुसरा भाग आहे. देशासमोरील विषय हे राजकारणापेक्षा महत्त्वाचे आहेत. आपल्यावर अन्याय करत असाल तर मैत्रीचा विषय येतोच कुठे ? असे म्हणत त्यांनी पुढील काळात भाजप सोबत मैत्रीचा विषय संपवला.

 

बिगर भाजप राज्यात षडयंत्र सुरु
बिगर भाजप राज्यात राजकीय षडयंत्र सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करुन विरोधकांवर दबाव टाकला जात आहे.
पण टक्कर द्यायला आम्ही सज्ज आहोत. घाणेरडं राजकारण थांबायला पाहिजे.
हातात राज्याची सत्ता नसल्याने नैराश्येतून हे सुरु आहे, असा टोला ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला.

 

ते त्यांचे वैयक्तिक मत
गेल्या अडीच वर्षात शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आघाडीबाबत फेरविचार करायला हवा असे परखड मत तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केले होते.
यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, दोन पक्ष जिथं एकमेकांविरोधात लढलोय तिथं नाराजी असणं स्वाभाविक आहे.
वरिष्ठ नेते लक्ष घालत आहे, तानाजी सावंत यांचे ते वैयक्तिक मत होते. भेदभाव न करता पुढे जावं लागले.
नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं म्हणत तानाजी सावंत यांच्या विधानावर आदित्य ठाकरे यांनी जास्त बोलणे टाळले.

नाणार बाबत दोन्ही बाजू ऐकून घेणार
नाणार प्रकल्पासाठी (Nanar Project) येथील स्थानिकांचा विश्वास महत्त्वाचा आहे.
विरोध आणि सत्ताधारी अशा दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेणार आहे.
या प्रकल्पासाठी पर्यायी जागा शोधत आहेत. प्रदूषण (Pollution) होणार नाही अशाच ठिकाणी हा प्रकल्प होईल.
दोन्ही पक्षांची बाजू ऐकून त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना (CM) देणार आहे. त्यानंतर या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

 

रत्नागिरी एअरपोर्टला 100 कोटी
सिंधुदुर्ग येथे राजकीय मोर्चेबांधणीपेक्षा पर्यावरणावर विशेष भर देत आहे. सिंधुदुर्गला जे वचन दिले होते ते पूर्ण करतोय.
एयरपोर्ट (Airport) व मेडिकल कॉलेजचे (Medical College) वचन आम्ही पूर्ण केलंय.
रत्नागिरी एयरपोर्टला (Ratnagiri Airport) 100 कोटी रुपये देतोय. चिपी विमानतळ (Chipi Airport) असेल, सागरी महामार्ग असेल, काही कामे झाले आहेत तर काही कामे होत आहेत.
येथील कामे वाढत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

 

Web Title :- Aaditya Thackeray | shivsena leader and environment minister aditya thackeray ended the issue of alliance with bjp at kokan Sindhudurg

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा