… तर माझे कान पकडा HM शहा यांचे विधान, ‘आप’चं ‘प्रत्युत्तर’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे तसा दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात आरोप – प्रत्यारोप, विकासाचे दावे यामुळे रंगत वाढत चालली आहे. दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यातच लढत आहे. भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मैदानात उतरल्याने शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात शाब्दीक युध्द चालले आहे.

आम्ही दिल्लीला जागतिक दर्जाचे शहर बनवू आणि न बनविल्यास माझा कान पकडा, असे आक्रमक विधान शहा यांनी प्रचारात केले. त्यांच्या या विधानाला केजरीवाल यांनी, हा चुनावी जुमला तर नाही ना असे म्हणत उत्तर दिले आहे. आम्हालाही दिल्ली जागतिक दर्जाचीच करायची आहे. तुमचे आश्वासन चुनावी जुमला नसेल तर आपण सर्वजण मिळून दिल्लीला जागतिक दर्जाची बनवू. पण नंतर आश्वासन बदलू नका, आणि दिल्लीकर चांगले आहेत ते कोणाचा कान पकडणार नाहीत, असे केजरीवाल शहा यांना उद्देशून म्हटले आहे.