लेखी माफी माग अन्यथा… गौतम गंभीरला ‘आप’चा २४ तासांचा ‘अल्टीमेटम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व दिल्लीतील भाजपाचे उमेदवार आणि पूर्व क्रिकेटर गौतम गंभीर यांनी आपने २४ तासांच्या आत लेखी माफी मागण्याचा अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ झाली आहे. आपच्या उमेदवार मार्लेना यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूराची पत्रके वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत गंभीर आणि भाजपाने पुढील २४ तासात लेखी माफी मागावी आणि वृत्तपत्रांमधून खरे आणि योग्य वस्तुस्थिती मांडावी अशी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

गौतम गंभीर याच्यावर आपचे उमेदवार मार्लेना यांनी आक्षेपार्ह पत्रक वाटल्याचा आरोप केला आहे. यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. याबाबत मार्लेशी यांनी पत्रकार परिषद घेऊन वाटण्यात आलेल्या पत्रकांमधील मजकूर वाचून दाखवला होता. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे म्हटले होते तर मार्लेना यांनी या प्रकरणात दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.

…तर मी लोकांसमोर फाशी घेईन

आपने या प्रकरणात गौतमविरोधात नोटीस बजावली आहे. यामध्ये येत्या २४ तासांत लेखी माफी मागावी आणि त्या पत्रकातील मजकुराबाबत खरे, योग्य बाबी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध कराव्यात असे सांगण्यात आले आहे. या आरोपांवर गंभीरने टोकाचे पाऊल उचलले असून मार्लेना यांच्याबाबत मी जर असा प्रकार केला असेल हे केजरीवाल आणि आपने सिद्ध केल्यास मी लोकांसमोर फाशी घेईन असे ट्विट केले आहे. तसेच जर केजरीवाल अपयशी ठरले तर त्यांनी राजकारण सोडावे, असे आव्हान देखील गौतम गंभीर याने केले आहे.