अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिलेला नाही, उद्या मातोश्रीवर जाणार ; अर्जुन खोतकरांचा ‘दावा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न सुरु होता. अर्जुन खोतकर यांच्यावर अब्दुल सत्तार यांच्या मनधरणीची जबाबदारी देण्यात आली होती. सकाळपासून सत्ताराच्या राजीनाम्याचा चर्चा सुरु झाली होती. परंतु त्यानंतर अर्जुन खोतकर यांनी आज पुन्हा दुसऱ्यांदा सत्तार यांची भेट घेतली. सत्तार आणि खोतकर यांच्यात अर्धा तासभर चर्चा झाल्यानंतर खोतकर यांनी दावा केला की अब्दुल सत्तार यांनी कोणताही राजीनामा दिला नाही.

खोतकर यांनी दावा केला की सत्तार यांनी राजीनामा दिलेला नाही. सत्तार उद्या मातोश्रींवर जाणार आहेत. सत्तार यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणं झाली. सत्तारांची नाराजी आता दूर झाली आहे.

खोतकर म्हणाले की उद्या अब्दुल सत्तार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची भेट होणार आहे. उद्या 12.30 वाजता अब्दुल सत्तार मातोश्रीवर जाणार आहेत. सत्तार अजिबात नाराज नाही. राजीनाम्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. सत्तार स्वत: बोलले नाहीत की त्यांनी राजीनामा दिला, मग चर्चा का, त्यांनी राजीनामा दिलेला नाही.

देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका –
महाराष्ट्राच्या इतिहासात हे कधी झालं नाही, महिनाभर कोण कोणते मंत्री आहेत हेच माहित नाही, आता मंत्री झाले तर खातेवाटप गेले सात दिवस झालं नाही, सर्वांना मलाईदार खाती हवी आहेत. कोणीही कृषि खातं घ्यायला तयार नाही, भांडत त्यासाठी नाही. मलाईदार खातं हवं, मलाई कशात आहेत अशी खाती हवीत. मलाईदार खात्यासाठी जनतेला हे विसरले अशी खोचक टीका करत फडणवीस यांनी ठाकरे सरकारला घेरलं.

ठाकरे सरकारची ही पतनाची सुरुवात असे म्हणत त्यांनी महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये खदखद असल्याचे सांगितले. यावेळी ते वाशिमच्या सभेत जनतेला संबोधित करत होते.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/