Abdul Sattar | तुम्ही PM मोदींचे फोटो लावून निवडणूक जिंकलात, आमचा राजीनामा मागणाऱ्या आदित्य ठाकरेंनीही राजीनामा द्यावा; अब्दुल सत्तारांची टीका

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) मराठवाडा दौऱ्यावर आहे. औरंगाबाद (Aurangabad) येथे त्यांच्या उपस्थितीत अनेक विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सिल्लोड मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची सभा झाली. यावेळी बोलताना अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. आमचे राजीनामे (Resignation) मागणाऱ्या आदित्य ठाकरेंनी आधी राजीनामा द्यावा अशी टीका सत्तार यांनी केली.

 

शिंदे गटात गेलेल्यांनी हिंम्मत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणुका जिंकून दाखवा असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला होता. यावर प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तार म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी त्यांचा तिकडे राजीनामा द्यावा मी माझा इकडे राजीनामा देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे फोटो लावून तुम्ही निवडणूक जिंकले असून, आमच्यावर अशी टीका करु नका, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

 

दानवे-खोतकरांची उपस्थिती

अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात आयोजित जाहीर सभेला रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांची उपस्थिती बघायला मिळाली.
तर यावेळी खोतकर यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
मराठवाड्यातील राजकारणात अब्दुल सत्तार, राबसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची जोरदार चर्चा सुरु असते.
विशेष म्हणजे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे हे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने चर्चेचा विषय बनला होता.

 

Web Title :- Abdul Sattar | shivsena aditya thackeray who demanded our resignation should also resign abdul sattar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा