Abdul Sattar | जळगावमध्ये ठाकरे गट आक्रमक, कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या ताफ्यावर फेकले खोके अन् कापूस

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी (दि.22) राज्याचे कृषीमंत्री (Agriculture Minister) अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव ते सायंकाळी पाचच्या सुमारास पोहचले असता धरणगाव शहरात ठाकरे गटातर्फे (Thackeray Group) सत्तार (Abdul Sattar) यांच्या मोटारीच्या ताफ्यावर कापूस आणि खोके फेकत निषेध करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे जळगाव जिल्ह्यात गारपीटग्रस्त शेतांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत शिंदे गटाचे (Shinde Group) जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील हे होते. धरणगावातून जात असताना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कापसाने भरलेले खोके त्यांच्या मोटारीच्या ताफ्यासमोर (Abdul Sattar Convoy) फेकून निषेध केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मंत्री सत्तार आणि राज्य सरकारचा ठाकरे गटाने निषेध केला.

यावेळी ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख तथा धरणगावचे माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, जिल्हा उपप्रमुख
योगेश वाघ आदींनी सत्तार यांच्या ताफ्यावर कापूस फेकड ताफा अडविण्याचा प्रयत्न केला.
यावेळी गुलाबराव वाघ यांनी कापसाला 10 ते 12 हजार रुपये भाव मिळावा यासाठी आम्ही
सत्तार यांना भेटून मागणी करणार होतो. मात्र, ते न थांबताच निघून गेल्याचे वाघ यांनी सांगितले.

Web Title : Abdul Sattar | thackeray-group-threw-cotton-on-abdul-
sattars-convoy-in-dharangaon-jalgaon-district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | पहिली ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा; अयोध्या वॉरीयर्स, कल्याण इलेव्हन संघांची विजयी सलामी

Pune Hadapsar News | हडपसरमध्ये गुढीपाडवा उत्सवानिमित्त अनेक सामाजिक संघटनांकडून शोभा यात्रा

Abdul Sattar | दोन दिवसांत पंचनामे करुन विधिमंडळात भरपाईची घोषणा करणार, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

Devendra Fadnavis | समाजाच्या उत्तम भविष्यासाठी नव्या पिढीला संस्कृतीची माहिती आवश्यक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune Political News | कसबा पोटनिवडणुकीनंतर रवींद्र धंगेकर अन् हेमंत रासने प्रथमच आमने-सामने, हस्तांदोलन करुन म्हणाले…

Pune MP Girish Bapat | खा. गिरीश बापट यांच्या धार्मिक विकास निधीमधून ‘कसबा गणपती’च्या प्रांगणात भित्तिचित्र शिल्पाचे लोकार्पण; आमदार रवींद्र धंगेकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची उपस्थिती