50,000 हजाराची लाच स्विकारताना पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – तक्रारी अर्जावरून गुन्हा न करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात अडकला. लाचेची रक्कमेसाठी पोलीस उपनिरीक्षकाने तक्रारदार व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. तक्रारदाराकडून पैसे घेतेवेळी कारवाईचा संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षकाने 50 हजार रुपयाची लाच घेऊन पळून गेला. शंकर एस. बोंडे असे पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून तो नागपूर शहर पोलीस दलात कार्यरत आहे. या कावाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

शंकर बोंडे हा पाचपावली पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांनी नागपूर येथील जसवंत आयनॉक्स सिनेमा हॉल येथे दुकान खरेदी केले होते. या दुकानाच्या करारनाम्याबाबत तक्ररदार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा तक्रारी अर्ज पोलीस ठाण्यात दाखल आहे. या अर्जावरून गुन्हा दाखल न करण्यासाठी बोंडे याने तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली. पैसे देण्यासाठी त्याने तक्रारदार यांना मारहाण करुन 90 हजार रुपये वसुल केले. उर्वरीत 1 लाख 10 हजार रुपयासाठी बोंडे याने तगादा लावला होता. यामध्ये तडजोड करून 50 हजार रुपये देण्याचे ठरले होते.

तक्रारदार यांनी नागपूर लाचलुपच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचप अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळी केली असता शंकर बोंडे याने पाचपावली पोलीस ठाण्यात पैसे घेण्याचे कबुल केले. आज पाचपावली पोलीस ठाण्यात लाचलुचपत अधिकाऱ्यांनी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 50 हजार रुपयाच्या लाचेची रक्कम बोंडे याने स्विकराली. मात्र, त्याला आपल्यावर सापळा रचण्यात आला असल्याचा संशय आला. त्याने तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेऊन तेथून पळून गेला. पोलीस उपनिरीक्षक शंकर बोंडे याच्याविरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार, पोलीस उपअधीक्षक मिलींद तोंतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, योगेश्वर पारधी, पोलीस शिपाई सचिन हलमारे, सुनिल हुकरे, कृणाल कडव, चालक दिनेश धार्मीक यांनी केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : Policenama.com