उमरखेड : लाच मागितल्या प्रकरणी दोघांना ‘अटक’ !

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – निवृत्त वनपरिक्षेत्र अधिका-याचे थकलेले वेतन मंजूर करून देण्याकरिता लाच मागितल्याप्रकरणी उमरखेड उपकोषागार कार्यालयातील (sub-treasury-office) दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (acb-set-trap) सोमवारी सापळा रचून अटक केली आहे.

उपकोषागार अधिकारी अंबादास मेसरे व वनरक्षक गोविंद फुलवरे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. निवृत्त वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे चार महिन्यांचे वेतन थकले होते. त्याचे देयक मंजूर करून देण्याकरिता मेसरे आणि फुलवरे या दोघांनी सहा हजार रुपयांची लाच मागण्यात आली. ही तक्रार प्राप्त होताच सोमवारी सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई एसीबीचे अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजेंद्र क्षीरसागर, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर शेंडे, अनिल राजकुमार, राकेश सवसाकडे, महेश वाकोडे, सचिन भोयर, राहुल गेडाम, संजय कांबळे आदींनी पार पाडली.