ACB Trap Case | शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपीक 50 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap Case | शालार्थ क्रमांक मिळण्यासाठी शाळेच्या मार्फत शिक्षणाधिकारी कार्य़ालयात (Education Officer Nashik Office) पाठवलेला प्रस्ताव मंजुर करण्यासाठी 50 हजार रुपये लाच स्वीकारताना नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले (Nashik ACB Trap). दिगंबर अर्जुन साळवे (Digambar Arjun Salve) असे लाचखोर लिपीकाचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने ही कारवाई बुधवारी (दि.13) नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयात केली. (ACB Trap Case)

तक्रारदार हे खासगी शाळेत शिपाई पदावर कार्यरत आहेत. त्यांना नेमणुकीच्या तारखेपासून अद्यापपर्यंत कोणतेही वेतन मिळालेले नाही. हे वेतन मिळण्यासाठी आवश्यक असलेला शालार्थ क्रमांक मिळवण्यासाठी शाळेच्या मार्फत शिक्षणाधिकारी कार्य़ालयात प्रस्ताव सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजुर करण्यासाठी कनिष्ठ लिपीक दिगंबर साळवे याने तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार केली. (ACB Trap Case)

एसबीच्या पथकाने पडताळणी केली असता दिगंबर साळवे याने तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडू 50 हजार रुपये लाच स्वीकारताच दिगंबर साळवे याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी (Addl SP Madhav Reddy) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर (DySP Anil Badgujar) आणि त्यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे खून प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, कारण आलं समोर

पुणे पोलिसांकडून पावणे पाच कोटींचा अमली पदार्थांचा साठा नष्ट

खरेदी केलेली अ‍ॅम्ब्युलन्स नावावर करुन न देता कंपनीची फसवणूक, खेड येथील घटना

Pune PMC License Inspector Suspended | कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयातील
3 परवाना निरीक्षक निलंबित, नदीपात्रातील होर्डिंग प्रकरण भोवलं