Pune PMC License Inspector Suspended | कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयातील 3 परवाना निरीक्षक निलंबित, नदीपात्रातील होर्डिंग प्रकरण भोवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC License Inspector Suspended | पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील नदीपात्रामध्ये नियमांचे उल्लंघन करुन, वृक्षतोड करुन होर्डिंग (Illegal Hoardings In Pune) लावल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत माध्यमांमधून वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने कसबा-विश्रामबागवाडे क्षेत्रीय कार्यालयातील तीन परवाना निरीक्षकांना निलंबित केले आहे. याप्रकरणी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तिघांवर बुधवारी (दि.13) निलंबनाची कारवाई करण्यात आली. (Pune PMC License Inspector Suspended)

कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयातील परवाना निरीक्षक राजेंद्र केवटे (Rajendra Kewte), राजेंद्र राऊत (Rajendra Raut) आणि लक्ष्मीकांत शिंदे (Laxmikant Shinde) असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. निलंबनाचे आदेश पुणे महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाचे (PMC Skysign & License Department) उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap) यांनी काढले आहेत. (Pune PMC License Inspector Suspended)

संभाजी पोलीस चौकीच्या पाठीमागे नदीपात्रात निलेश सुरेश चव्हाण यांनी नियमांचे उल्लंघन करुन तसेच वृक्षतोड करुन होर्डिंग उभारले होते. याबाबत वृत्तपत्रांमधून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ), उपायुक्त परवाना व आकाश चिन्ह विभाग, उपायुक्त परिमंडळ 5, महापालिका सहाय्यक आयुक्त कसबा विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय यांनी 30 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. त्येवळी निलेश चव्हाण यांनी नदीपात्रामध्ये राडारोडा टाकून वृक्षतोड केल्याचे दिसून आले. तसेच जाहिरात फलक उभारताना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता काही त्रुटी आढळून आल्या आहेत.
यामध्ये तीन होर्डिंग लावण्याची परवानगी दिली असताना संपूर्ण 100 फुटांचे एकच होर्डिंग उभे केले आहे,
पुलाच्या भरावाला छेद देऊन होर्डिग उभे करणे, जागेवर पोलीस चौकी असताना खासगी
मालकी कशी होऊ शकते याबाबत स्पष्टता नाही, वृक्षतोड करण्यात आली असून वृक्षतोडीचा परवाना घेतला नाही,
जागेचा मोजणी नकाशा नाही, पोलीस विभागाचा अभिप्राय नाही,
होर्डिंग उभे करण्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे नाहीत, अशा आक्षेपार्ह त्रुटी आढळून आल्या आहेत. याप्रकरणात परवाना निरीक्षकांनी त्यांना नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्याने तिघांना मनपा सेवाविनियम नियमानुसार निलंबित करण्यात आले आहे. (PMC Employees Suspended)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे खून प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, कारण आलं समोर

पुणे पोलिसांकडून पावणे पाच कोटींचा अमली पदार्थांचा साठा नष्ट

खरेदी केलेली अ‍ॅम्ब्युलन्स नावावर करुन न देता कंपनीची फसवणूक, खेड येथील घटना