ACB Trap Case News | 1 लाख 10 हजार रुपये लाच घेताना जिल्हा क्रीडा अधिकारी (क्लास वन) अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap Case News | कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाला पुरवलेल्या साहित्याचे बिल मंजूर करण्यासाठी 1 लाख 10 हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा क्रीडा अधिकारी यांना कोल्हापुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Kolhapur ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. चंद्रशेखर विश्वनाथ साखरे Chandrasekhar Vishwanath Sakhare (पद- जिल्हा क्रीडा अधिकारी,(वर्ग -01) कोल्हापूर. रा.आई निवास 156/2 प्लॉट नंबर 5, राजगुह हौसिंग सोसायटी, वृंदावन व्हीला शेजारी विश्रामबाग, सांगली) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या क्लास वन अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.3) केली. (ACB Trap Case News)

याबाबत 45 वर्षाच्या व्यक्तीने कोल्हापूर एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार हे वेगवेगळ्या सरकारी विभागांना साहित्य पुरवठा करण्याचे काम करतात. त्यांनी ऑनलाईन महा टेंडर वरती कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाला आवश्यक असलेले साहित्य हे जाहिरातीनुसार पुरवले होते. या साहित्याचे एकूण बिल 8 लाख 89 हजार 200 रुपये झाले होते. हे बिल मंजूर करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी तक्रारदार यांच्याकडे बिलाच्या एकूण रकमेच्या अंदाजे 15 टक्के प्रमाणे लाच मागितली. तडजोडीअंती 1 लाख 10 हजार रुपये देण्याचे ठरले. (ACB Trap Case News)

दरम्यान, तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी कोल्हापूर एसीबीकडे याबाबत तक्रार केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता चंद्रशेखर साखरे यांनी बिल मंजूर करण्यासाठी एक लाख 10 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने मंगळवारी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना चंद्रशेखर साखरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kolhapur Bribe Case)

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी (DySP Vijay Chaudhary)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे (DySP Sardar Nale),
पोलीस निरीक्षक बापू साळुंखे (PI Bapu Salunkhe),
श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, पोलीस अंमलदार सुनील घोसाळकर, सचिन पाटील, मयूर देसाई, रुपेश माने, संदीप पोवार, विष्णु गुरव यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | आंदेकर टोळीतील बंडु आंदेकर, कृष्णा आंदेकर याच्यासह 14 जणांवर FIR, जाणून घ्या प्रकरण

ससून रुग्णालयातील अनेक बड्या अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस संशयाच्या पिंजऱ्यात; महिला पीएसआयसह 7-8 पोलिस निलंबीत?

ACB Trap News | पतसंस्था मॅनेजरकडून लाच घेताना पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात