नंदुरबार/नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | सारंगखेडा येथील यात्रेनिमित्त दारु वाहतुकीचा व्यवसाय करु देण्यासाठी 21 हजार रुपयांची लाच मागितली. यातील 10 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकासह (Police Inspector) चालक पोलीस शिपायाला (Police Constable) नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) रंगेहाथ पकडले. एसबीच्या या कारवाईमुळे नंदुरबार पोलीस दलात (Nandurbar Police) खळबळ उडाली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.23) करण्यात आली.
सारंगखेडा पोलीस ठाण्याचे (Sarangkheda Police Station) पोलीस निरीक्षक संदीप उत्तमराव पाटील PI Sandeep Uttamrao Patil (वय-44) आणि चालक पोलीस शिपाई गणेश भामट्या गावीत Ganesh Bhamtya Gavit (वय-38) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 35 वर्षीय व्यक्तीने नाशिक एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे.
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे यात्रा उत्सव सुरू झाला आहे. या यात्रेत तक्रारदार दारु व्यावसायिकास दारू वाहतूक करण्यास परवानगी पाहिजे होती. त्यासाठी त्याने पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्याशी संपर्क केला. त्याबदल्यात त्याच्याकडे 21 हजाराची लाचेची मागणी पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पोलीस शिपाई गणेश गावित यांनी केली. तडजोडी अंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याप्रकरणी नाशिक लाचलुचपत विभागाकडे (Nashik ACB) तक्रार दाखल केली.
प्राप्त तक्रारीची एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सारंगखेडा येथे सापळा रचला.
ठरल्याप्रमाणे दहा हजाराची रक्कम स्वीकारताना
पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचा वाहन चालक शिपाई गणेश गावित या
दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी (Addl SP Madhav Reddy) पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे (PI Parasuram Kamble),
पोलीस अंमलदार सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी यांच्या पथकाने केली.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार, चार जणांना अटक; कर्वेनगर मधील घटना
पीएमपीएमएल बस कर्मचाऱ्याला मारहाण करुन रोकड पळवली, दोघांना अटक; बिबवेवाडी परिसरातील घटना
‘आम्ही इकडचे भाई आहोत’ हवेत कोयते फिरवून एकावर वार, येरवडा परिसरातील प्रकार